अखिल भवानी पेठ पोलीस लाईन श्री गणेश तरुण मंडळातर्फे गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा…
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे : अखिल भवानी पेठ पोलीस लाईन येथील श्री गणेश तरुण मंडळातर्फे गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मंडळाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मंदिर व गणेश मूर्तीच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत परिश्रमपूर्वक पूर्ण केले. त्या अनुषंगाने नवीन मंदिर व नवीन गणपती मूर्तीचा उद्घाटन सोहळा मंडळाचे आधारस्तंभ मा. प्रशांत भाऊ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सकाळी भवानी माता मंदिर, भवानी पेठ पोलीस लाईन परिसरातून नवीन गणपती मूर्तीची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी गणेश याग, होम-हवन तसेच पोलीस लाईनमधील महिलांच्या उपस्थितीत पाळणा हलवून गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
सायंकाळी पोलीस लाईनमधील रहिवासी व परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे १,००० ते १,२०० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. नव्याने उभारण्यात आलेले मंदिर पाहून सर्व उपस्थितांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
भविष्यातही असेच विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल व आशीर्वादाबद्दल लाईन बॉईजतर्फे सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

