बाल लैंगिक अत्याचार विरोधी पोलीस यंत्रणा व मुस्कान मार्फत जनजागृती..


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दामिनी मार्शल कोथरूड व फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन मुस्कान तर्फे शंकरराव मोरे विद्यालय येथे कार्यशाळा. आयोजित केली होती सदर कार्यशाळेमध्ये मुस्कान संस्थेचे समुपदेशक धनश्री मोरे,पूजा कडू,शुभांगी घरबुडे,निशा कुलकर्णी प्रोमोद पाटील यांनी मुलांना बालक म्हणजे कोण ? बालकांचे अधिकार, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, स्पर्श कोण व कुठे होऊ शकतात. त्यावेळी आपण काय करावे तसेच असे असुरक्षित स्पर्श होत असल्यास माहिती कोणाला द्यायची हे सांगण्यात आले. व मुस्कान संस्थेचे हेल्पलाईन नंबर 9689062202/912299784 नंबर देऊन बालकांच्या सुरक्षेसाठी असणारा पोक्सो कायदा या विषयी माहिती दिली.

Advertisement

कोथरूड दामिनी मार्शल अनुष्का जगदाळे व श्रुती कडणे यांनी 

विद्यार्थ्यांची भेट घेऊन मुलांना पोलीस दीदी, पोलीस काका उपक्रमा बद्दल माहिती देऊन पोलीस हेल्पलाईन 1098,व 112 बाबत माहिती दिली. सायबर क्राईम,मोबाईल इंटरनेट अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम व उपयोग, वाहतुकीचे नियम या बद्दल माहिती दिली. MIT University यंगर डेमोक्रॅट क्लब मधील सहकारी सोबत होते. यासाठी शाळेचे सहकार्य लाभले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!