बालिका दिनानिमित्त बाललैंगिक अत्याचार व पॉक्सो कायदा याविषयी जागर…


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन मुस्कान संस्था, बालजीवन विकास प्राथमिक शाळा व खडक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली बालक विकास प्राथमिक शाळा भवानी पेठ या शाळेमध्ये बालक पालक यांच्यासाठी बाललैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा याविषयी कार्यक्रम घेण्यात आला.

खडक दामिनी मार्शल निवेदिता यादव व स्वाती झेंडे यांनी महिला व मुलांसाठी असणाऱ्या हेल्प लाईन नंबर ची माहिती दिली. 

Advertisement

धनश्री मोरे , राणी लोखंडे व मोहन कवटे यांनी मुलांना बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय, मुलांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्श तसेच असे असुरक्षित स्पर्श होत असल्यास माहिती कोणाला द्यायची हे सांगण्यात आले.

प्रमोद पाटील यांनी बालिका दिन व बालिका दिन साजरा करण्याचे कारण याविषयी माहिती देऊन पालकांना या दिनानिमित्त मुलांना आपण कसे सुरक्षित ठेवू शकतो व पालकांनी आपल्या मुलांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो केस मध्ये मदतीसाठी हेल्पलाईन नंबर – 9689062202 / 9112299785

­ला फोन करण्यास सांगितले.

यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली चव्हाण मॅडम व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!