गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी ! दोन वर्षांपासुन चोरीच्या ३ गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत चोरटास जेरबंद 


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील अधिकारी व अंमलदार लोकसभा निवडणूक तसेच अतिमहत्त्वाचे व्यक्ती बंदोबस्त कामी लोणीकाळभोर पोस्टे हद्दीत प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे ,पो हवा बाळासाहेब सकटे पो अं शेखर काटे यांना गुप्त बातमी मिळाली की लोणीकाळभोर पो स्टे कडील चोरीच्या ३ गुन्ह्यात पाहिजे असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे पवन आश्रुबा वाघमारे वय-23वर्षे,रा.वेताळबाबा हडपसर, पुणे हा वेषांतर करून राहत असून सध्या तो HP पेट्रोल पंप समोर टेकनो मल्टि सर्विसेस या दुकानात बसलेला आहे बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचून वरील इसमास शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी लोणी काळभोर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे .

Advertisement

वरील इसम हा खालील गुन्हयात पाहिजे आहे . 

1) लोणीकाळभोर पोस्टे (अपडेटेड लिस्ट क्रं 92 ) गुरनं ५५८ /२०२२ भादवी कलम ३७९

2)लोणी काळभोर (अपडेटेड लिस्ट क्रं 99 )पोस्टे गुरनं 243 /2023भादवी कलम 379 ,201,411,34

3) लोणीकाळभोर पोस्टे (अपडेटेड लिस्ट क्रं 99 ) गुरनं 275 /2023 भादवी कलम 379

 


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!