लोणी काळभोर पोलीसांची अवैध हातभट्टी दारु धंद्यांवर कारवाई, २,९५,०००/-रुपयांचा ऐवज केला जप्त.


प्रमोद सावंत पुणे प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज !  ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करणे बाबत दिलेले आदेशा नुसार लोणी काळभोर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सुचना करुन अवैध धंदयांवर प्रभावी कारवाई ची मोहिम राबविली आहे.
सदर मोहिमेचे अनुषंगाने दि. ०४/०४/२०२६ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्कें व त्यांचे पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी गस्त घातली. सदर गस्तीदरम्यान त्यांना सकाळी ०९/१५ वा. चे सुमारास, लोणी काळभोर येथे असलेले आलमगीर जामा मज्जीद कब्रस्तानचे जवळ असलेले एका घराचे समोर असलेले पत्र्याचे शेड मध्ये एक इसम व महीला नामे १) मुबारक जाफर गड्डे, वय ४८ वर्षे, रा. आलमगीर जामा मज्जीद कब्रस्तानचे जवळ, पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे व २) बानो मुबारक गड्डे, वय ४० वर्षे, रा. सदर हे एका पांढरे रंगाचे सिनटेक्सचे ५०० लिटरचे टाकीमध्ये ४५० लिटर गावठी हातभट्टी ची तयार दारु ठेवून ती वेगवेगळे प्लास्टीकचे कॅनमध्ये भरुण ती इतरत्र विक्री करणेचे उद्देशाने एका चारचाकी आल्टो कार व दोन दुचाकी वरती ठेवत असताना मिळुण आलेने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील ४५,०००/-रु. किंमतीची ४५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु, १,५०,०००/- रु. किंमतीची चारचाकी अल्टो कार,५०,०००/- रु. किंमतीची टी व्हि एस ज्युपीटर मोपेड व ५०,०००/- रु. किंमतीची होंन्डा अॅक्टीव्हा मोपेड असा एकुण २,९५,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त केला असुन, सदरची गावठी हातभट्टीची दारु त्यांनी इसम नामे समीर संजय राठोड, वय २३ वर्षे, रा. शिंदावणे काळेशिवार, कंजारवस्ती, ता. हवेली, जि. पुणे याचेकडुन घेत असले बाबत तपासात सांगीतलेने वरिल आरोपी यास सुध्दा शिंदवणे येथे जाऊन ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस सदर महिलेविरुध्द गु.र.नं. १३९/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदरची विशेष कारवाई श्री राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ६ पुणे शहर, श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त सोो, लोणी काळभोर विभाग पुणे शहर, श्री राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीसा निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, श्रीमती स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली श्री दिगंबर सोनटक्के पोलीस उप निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पोलीस हवा. १७०४ माने, पोलीस हवा. ७५१९ जगदाळे, पोलीस अं.४५९२ दडस, पोलीस अं.२० गिरी, पोलीस अं.५१२४ सोनवणे व मु.पो.अं.२६९ पोळ यांचे पथकाने केलेली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!