डि.सी.एम सोसायटीच्या महात्मा ज्योतिबा फुले,नाना पेठ या मैदानात रंगली एक दिवसीय भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*


पुणे प्रतिनिधी अभिषेक साळुंखे 
महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे : डि.सी.एम सोसायटीच्या महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, नाना पेठ येथील मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला स्थानिक क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेचे आयोजन अक्षय भाऊ जावळे व एमजेपी क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा नॉकआऊट पद्धतीने खेळवण्यात आली.
अंतिम सामन्यात राजेवाडी क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, तर एमपीएस क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून राहुल नाना घोरपडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वेदांत केंजळे यांना गौरविण्यात आले. तसेच संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रदीप न्यायनीत (डॉन) यांना मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
प्रथम क्रमांकासाठी पोलीस बॉईज संघटना, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक-अध्यक्ष मंगेश दादा रोकडे यांच्यातर्फे ट्रॉफी व रु. ५५५५ रोख पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ खरात यांच्याकडून ट्रॉफी व रु. ३३३३ रोख बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेला अजय भाऊ भोसले, विशाल भाऊ शेवाळे, सुरेश मामा अवचिते यांसह स्थानिक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. सर्व संघांच्या सहकार्यामुळे स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. भविष्यातही अशी स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!