जे जे ऍक्ट व पोक्सो कायदा २०१२ याचे बाल पोलीस पथक सदस्यांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न


संपादक :- पंकेश जाधव  7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अमरावती, मिरॅकल फॉउंडेशन, युनिसेफ व फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन – मुस्कान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे मंथन हॉल, जोग स्टेडियम अमरावती येथे बाल न्याय (काळजी व संरक्षण ) अधीनियम २०१५ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधीनियम २०१२ (पोक्सो कायदा) विषयक बाल पोलीस पथक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणाचे संचालन ऍड सीमा भाकरे यांनी तर प्रास्ताविक मिरॅकल फॉउंडेशनचे संदीप कांबळे यांनी केले.

Advertisement

जे जे ऍक्ट विषयी मा. श्री. अनिरुद्ध पाटील विपला फॉउंडेशन यांनी तर बाल लैंगिक अत्याचार व त्या अनुषंगाने घडणारे विविध प्रकारचे गुन्हे, त्याबद्दल घ्यावयाची खबरदारी व पोक्सो कायदा याविषयी एफएफसीपी मुस्कान चे प्रशिक्षक प्रमोद पाटील व पूजा सातव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी मा. श्री. अर्जुन ठोसरे साहेब पोलीस निरीक्षक अमरावती, उदघाट्क मा. श्री. डॉ. उमेश टेकाळे महिला बाल विकास अधिकारी अमरावती. मा. श्रीमती. किरण पुंशी मॅडम बाल कल्याण समिती अध्यक्ष, मा. श्री. महावीर वासनिक, व मा. श्रीमती.उज्वला श्रीराव बाल न्यायमंडळ सदस्य, मा. श्री. अजय डबले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती इ. ची मचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच प्रशिक्षणा मध्ये मा. श्रीमती. सुचिता बर्वे, दीपाली महाजन, सारिका तेलखडे, बाल कल्याण समिती सदस्य अमरावती, ऍड सीमा भाकरे विधी व परिवक्षा अधिकारी, भूषण कावरे, नम्रता कडू, कीर्ती सगणे, आकाश बरवत, शशांक वैद्य, मनीषा फुलाडी, राहुल वैराळे इत्यादीचे प्रशिक्षण प्रसंगी सहकार्य लाभले. जवळपास 90 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी यांनी प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये उपस्थिती दर्शवली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!