अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरिया इसमास केले जेरबंद…


पंकेश जाधव संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि २०/०१/२०२४ रोजी पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर व तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२चे स्टाफसह मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक विदेशी नायजेरियन इसम हा वास्तुश्री अपार्टमेंट मार्केट यार्ड पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी कोकेन हा अमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर व अमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे जोसेफ रोतीमी वय 30 वर्ष राहणार रिद्धीम चर्च मिरा रोड मुंबई मूळ देश नायजेरिया हा त्याच्या ताब्यात एकूण 6.88.800 /- रुपयाचा ऐवज त्यामध्ये

Advertisement

१) 6.28.600/- किमतीचा 31 ग्रॅम 44 मिलिग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ,

२)५०,०००/-रु किमती पांढरा रंगाची स्कूटर होंडा एक्टिवा कंपनीची

3) 10.000/- रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा अमली पदार्थ व ऐवज हा विक्री करिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर —/2024 एनडीपीएस कलम 8 ( क ), 21(ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे सह पोलिस आयुक्त ,श्री. अमोल झेंडे सो पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री.सतीश गोवेकर सो सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, योगेश मांढरे. नितीन जगदाळे. युवराज कांबळे. साहिल शेख.संदिप शेळके महेश साळुंखे, अजीम शेख. संदीप जाधव, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!