शिवाजीनगर कोर्टामधून पळून जाणाऱ्या मोक्यासारख्या गंभिर गुन्ह्यातील न्यायबंदी राजेश रावसाहेब कांबळे यास हडपसर तपास पथकाने जेरबंद केले


पंकेश जाधव संपादक 7020794626

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- हडपसर पोलीस ठाणे कडील गु.र.नं ५३७/२०१४ भा.दं. वि. कलम १४३,१४७,१४८,१४९,३०२,३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii).३(२).३ (४) या गुन्ह्यात न्यायलयीन बंदी आरोपी राजेश कांबळे हा सन २०१४ पासून येरवडा कारागृहात होता. तसेच नमुद आरोपी विरूध्द स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं.२९५/२०१० भा.दं.वि.कलम ३९५,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ या दाखल गुन्ह्याची नियमीत सुनावणी सुरू होती.

दिनांक ०२/०८/२०२३ रोजी न्यायलयीन बंदी आरोपी राजेश कांबळे यास मा. जिल्हा सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे येथे स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं २९५/२०१० भा.दं. वि. कलम ३९५,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५ या गुन्ह्याचे न्यायालयीन सुनावणी कामी मा.सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे येथे नियमीत पेशी करीता येरवडा कारागृह येथून पोलीस बंदोबस्तात घेवून गेले होते. राजेश कांबळे याची न्यायालयीन सुनावणी संपल्यानंतर त्यास येरवडा कारागृहाकडे घेवून जात असताना तो पोलीस पथकाच्या कायदेशिर रखवालीतुन पळून गेला होता. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६०/२०२३ भादंवि कलम २२४,२२५,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Advertisement

नमुद पळून गेलेला आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. परंतु तो मिळून आलेला नव्हता. मा. पोलीस आयुक्त. पुणे शहर, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या आदेशावरून हडपसर पोलीस स्टेशन तपास पथक नमुद आरोपीचा शोध घेत असताना केलेला तांत्रिक तपास व बातमीदारांकडून नमुद आरोपी केज जिल्हा बिड येथे लपून बसले असल्याची खात्री लायक माहीती हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संदीप राठोड व अजित मदने यांना मिळाल्याने हडपसर पोलीस स्टेशन तपासपथकाने सापळा रचून दिनांक २०/०१/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी राजेश रावसाहेब कांबळे वय ३७ वर्ष रा. सर्वे नं.१०६, गोसावी वस्ती, हडपसर पुणे यास केज, जिल्हा बिड येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी राजेश कांबळे यास पुढील कायदेशिर कार्यवाही कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे यांच्या ताब्यात देण्यात येत आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. आर. राजा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभागपुणे, श्रीमती अश्विनी राख, यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री.संदीप शिवले, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!