काळेपडळ पोलीसांची दमदार कामगिरी ! अट्टल चोरास पाठलाग करुन शिताफिने पकडले, चार दुचाकी वाहने व एक घरफोडी चोरी केल्याचे उघड
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- काळेपडळ पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ भारतीय न्यायसंहीता कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी प्रविण कुमार अग्रवाल, रा. हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे यांनी यांची हिरो होंडा पॅशन प्रो ही मोटारसायकल दिनांक १४/०३/२०२५ रोजी कडनगर, उंड्री या ठिकाणी पार्क केली होती, दिनांक १५/०३/२०२५ रोजी फिर्यादी यांनी त्यांची मोटारसायकल सदर ठिकाणी मिळुन आली नाही म्हणून काळेपडळ पोलीस ठाणे येथे त्यांची गाडी चोरी झाल्याची तक्रार देण्याकरीता आले होते. दरम्यान काळेपडळ पोलीस ठाणेकडील पेट्रोलिंग कर्तव्य करीता नेमण्यात आलेले पोलीस अंमलदार ४८०२ लक्ष्मण काळे व पोलीस अंमलदार ८८७१ विशाल ठोंबरे यांना उंड्री चौकी परिसरात बिट मार्शल कर्तव्य नेमण्यात आले होते. नमुद अंमलदार हे पहाटे ०४/३० ते ०५/०० वा. सुमारास कडनगर चौक भागात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम दुचाकी वाहन ढकलुन घेवून जाताना दिसला म्हणुन बिट मार्शल अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी त्यास विचारपुस करीत असताना तो पळून जावु लागला असता बिट मार्शल अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन शिताफिने त्यास पकडून वाहनासह पोलीस ठाणे येथे घेवून आले.
पोलीस ठाणे हद्दीत रात्रपाळी कर्तव्यावर नेमण्यात आलेले सहा पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड यांनी त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव नितीन काळुराम पाटोळे, वय १६ वर्षे, रा. स. नं. १३०, दांडेकर पुल, पुणे असे सांगुन सदरचे वाहन चोरी करुन घेवून जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांने वेगवेगळ्या तीन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
१) काळेपडळ पोलीस ठाणे गु.र.नं. ७१/२०२५ भा.न्या. सं ३०३(२) मधील हिरो होंडा पॅशन प्रो
२) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. २६६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधील होंडा सीबी शाईन
३) वानवडी पोलीस ठाणे गु.रं.नं. ७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधील केटीएम २०० डयुकी
४) कोंढवा पोलीस ठाणे गु.रं.नं. ०७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) मधील होंडा अॅक्टिवा ११०
५) काळेपडळ पोलीस ठाणे गु.रं.नं. २२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३०५ एकुण ९,०००/- रु रोख रक्कम असा एकुण १,९२,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरीलप्रमाणे गुन्हे केल्याचे तपासात आढळुन आले आहे. विधीसंघर्षीत बालकाकडून वरील चारही वाहने व रोख रक्कम लपवुन ठेवलेल्या ठिकाणी जावुन ताब्यात घेण्यात आली आहेत. आरोपी विधीसंघर्षीत बालक हा चोरी केलेली वाहने घरफोडी व मौजमजा करण्यासाठी वापरत होता. पुढील अधिक तपास पोलीस हवालदार २०५४ प्रविण काळभोर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ.श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार ४८०२ लक्ष्मण काळे, पोलीस अंमलदार ८८७१ विशाल ठोंबरे पोलीस अंमलदार ८६४८ पंधरकर, पोलीस अंमलदार १००७० सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार ७७३९ दाऊद सय्यद, पोलीस अंमलदार ४७९ शाहिद शेख यांनी करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव