भरत तुकाराम जैद (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ७ साथीदार यांचे विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर.

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकाळभोर पोलीस ठाणेस गुन्हा रजि.नं. ६१४/२०२४ बी. एन.एस. कलम १०३(१), १०९, ११८(१), १२५, १२५(अ), १८९(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१ (१) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५). ३ (२७) महा.पो.अधि.क.३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयातील आरोपी भरत तुकाराम जैद (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ७ साथीदार यांचेविरुद्ध चाकण पो.स्टे., आळंदी पो.स्टे.. भोसरी पो.स्टे.. भोसरी एम आय डी सी पो.स्टे., निगडी पो.स्टे., दिधी पो.स्टे., पिंपरी पो.स्टे. येथे खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकापणे वाहन हाकून खुन नसलेला सदोष मनुष्य वध करणे, बेकायदेशीररीत्या हत्यार जवळ बाळगणे, बलात्कार, ठकवणुक, दहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

वरिल नमुद टोळीप्रमुख व त्याचे इतर साथीदार यांनी सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थीक उपलब्धीचे उद्देशाने तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचे टोळीची दहशत व नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्याचे उद्देशाने टोळी तयार केल्याचे गुन्हयाचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयातील टोळीप्रमुख भरत जैद व त्याचे इतर ७साथीदार यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.

सदर गुन्हयातील आरोपीतांनी संघटीतरित्या अनेक गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (i) ३(२).३(४) या कलमांचा अंतर्भाव होणेकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र पन्हाळे, लोणीकाळभोर पोलीस ठाणे यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परि-५, पुणे शहर यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर यांना प्रस्ताव सादर करणेत आला होता. त्यानुसार मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी सदर गुन्हयाचे कागदपत्रांची पडताळणी करुन सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (i) ३ (२), ३ (४) चा अंतर्भाव करणेस दि.१५/०३/२०२५ रोजी मान्यता दिल्याने त्याप्रमाणे गुन्हयात कलमवाढ करणेत आली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन राजेंद्र पन्हाळे, पोउपनि उदय काळभोर, पोलीस अंमलदार पोहवा तेज भोसले, पो. हवा. संभाजी देवीकर, पोशि प्रशांत नरसाळे, पो शि मंगेश नानापुरे, पोशि संदिप धुमाळ व मपोशि योगिता भोसुरे, यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत ही कारवाई करणेत आली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!