बिबवेवाड़ी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये आगामी येणारे गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सव, या अनुषंगाने दंगा काबु योजनेचे आयोजन केलेबाबत
पंकेश जाधव संपादक 7020794626
बिबवेवाड़ी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सवाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अप्पर बस डेपो याठिकाणी दंगा काबु योजना रंगीत तालीम राबविण्यात आली व त्यानंतर अप्पर बस डेपो तय्यबा मस्जिद राजीव गांधी नगर चौक अप्पर जुना बस स्टॉप चैत्रबन वसाहत डॉल्फिन चौक संविधान चौक परत बिबवेवाड़ी पोलीस स्टेशन असा रुट मार्च घेण्यात आला.
सदर दंगा काबु योजना रंगीत तालीम व रुट मार्च करीता बिबवेवाड़ी पोलीस स्टेशन कडील पोस्टे चे 02 पोनि, 03 सपोनि/पोउपनिरी व 20 अंमलदार शस्त्र, ढाल, लाठी सह सदर ठिकाणी उपस्थीत होते. तसेच शांतता कमिटी सदस्य हजर होते. गणेशोत्सव व ईद ए मिलाद या उत्सव काळातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने थोडक्यात माहिती देण्यात आली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

