हवेली तालुक्यातील शिंदवणे परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर धडक कारवाई.


पंकेश जाधव संपादक 7020794626

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. अधीक्षक साहेब, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांचे आदेशानुसार दि. २३/०४/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त खात्रीलायक बातमीनुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे या विभागाने गुन्हा अन्वेषण विशेष मोहीम राबवून हवेली तालुक्यातील शिंदवणे परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर अचानक छापे घालून सदर कारवाई मध्ये एकूण ०४ गुन्हे नोंदविले असून सदर कारवाईत कच्चे रसायन ३८०० लि., हातभट्टीची गावठी दारू ३१५० लि. व इतर अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण रु. ४,६९,४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत हातभट्टी निर्मिती करणाऱ्या ०४ अज्ञात इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (b, c, e वf) नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यांचा तपास निरीक्षक संजय कोल्हे, जी विभाग व दुय्यम निरीक्षक बी. जी. रेडेकर हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त श्री, धोमकर साहेब व पुणे जिल्हा अधीक्षक श्री. राजपूत साहेब तसेच हडपसर विभागाचे उपअधीक्षक श्री. शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय के. कोल्हे व दुय्यम निरीक्षक बी. जी. रेडेकर, यांनी केली आहे. सदर कारवाईत सर्वश्री दुय्यम निरीक्षक शिके व धावरे, सहा. दु. नि. आर. एस. मोडक आणि जवान संतोष गायकवाड, अमोल कांबळे व प्रमोद पालवे व जवान नि बाहन चालक दत्तात्रय आबनावे यांनी सहभाग घेतला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!