कारागृहातील बंद्यासाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा च्या संबंधी त्रैमासिक आढावा बैठकीचे आयोजन


पंकेश जाधव संपादक 7020794626

चंद्रपुर जिल्हा कारागृह, चंद्रपुर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन चंद्रपुर :-  चंद्रपुर जिल्हा कारागृह,वर्ग.1.येथे आज दि.31.08.2024.रोजी सन्मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार “ नालसा “ आणि “ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण “ यांचे मार्फत कारागृहातील बंद्यासाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा च्या संबंधी त्रैमासिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीस मा.श्रीमती.ऐ.डी.देव.मॅडम.अतिरिक्त सत्र न्यायाधीस.जिल्हा सत्र न्यायालय,चंद्रपुर.तसेच मा.सुमीत जोशी साहेब.सचिव.जि.वि.से.प्रा.चंद्रपुर.यांचे प्रमुख उपस्थितीत कारागृहातील सर्व विभागा मध्ये.पाकगृह,महिला विभाग,सर्व बॅरेक्स,दवाखाना.ह्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व.शासना मार्फत पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा उदा.जेवण,दवाखान्याची सोय,धान्य गोडाऊन,प्रत्यक्ष मुलाखत,ई – मुलाखत,कॉइन बॉक्स च्या माध्यमातून कॉल सेवा,व्ही.सी.विधी सेवा,सि.सि.टी.व्ही.यंत्रणा,शुद्ध पिण्याचे पाणी आरो वॉटर कुलर यंत्रणा.बाबत सखोल पाहणी केली.

 


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!