रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना मिळुन आल्याने त्यास केले जेरबंद
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०९/०३/२०२५ रोजी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हाद्दीत वरिष्ठांच्या आदेशान्वये तपास पथकातील पो.उप. निरी. सावन आवारे, व सहा. पोलीस निरी मोरे, पो.उप. निरी भापकर, स्टाफ सह पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करीत असताना पोलीस अंमलदार किरण जाधव यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे आतिक करीम बागवान रा.स.नं.५७०, गल्ली नं.०६, आंबेडकरनगर मार्केटयार्ड पुणे हा गल्ली नं. १४, आंबेडकरनगर, सार्वजनिक शौचालय भिंतीचे आड बाजुस उभा असले बाबत माहिती मिळाली असता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांना कळविली असता त्यांनी खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे आम्ही लागलीच पोलीस स्टाफ सह बैलबाजार येथे शेडच्या बाजुला गल्ली नं. १४, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे येथे आलो असता, सार्वजनिक शौचालय भिंतीचे आड आतिक करीम बागवान हा संशयास्पदरित्या उभा असलेला दिसून आला आम्ही त्याचे जवळ जात असता, त्याची व आमची नजरानजर झाली असता तो आम्हास पाहुन पळून जाऊ लागला त्यावेळी थोड्याच अंतरावर त्यास पकडले असता त्यावेळी सपोनि मोरे यांनी त्यास तु का पळून जात होतास त्यावेळी त्याने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता, तो सदर ठिकाणी एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबल्याचे सांगितले असता त्याची दोन पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचे जवळ ६ ग्रॅम ३०० मिली ग्रॅम एम. डी. (मॅफेड्रॉन) एकुण १,०९,०००/- रु.किं.चा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४१/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) गुन्हा करून त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहा. पोलीस निरी. मोरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि. ०५ पुणे डॉ. श्री राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पो उप नि सावन आवारे, सपोनि चेतन मोरे, पो उप नि भापकर, पोलीस अंमलदार जाधव, झायटे, यादव, यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव