कारागृहातील महिला बंद्यांकरीता राखी बनविणे प्रशिक्षण
पंकेश जाधव संपादक 7020794626
ठाणे मध्यवर्ती कारागृह,ठाणे.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन ठाणे :- ठाणे मध्यवर्ती कारागृहात 133 महिला बंदी दाखल असून,महिला बंद्यांकरीता कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. दरवर्षी प्रमाणे रक्षाबंधन निमित्त कारागृहातील महिला बंद्यांकरीता टाटा इन्स्टीटयुट ऑफ सोशल सायन्स (TISS) सामाजिक संस्थेच्या सहाय्याने दि.05.08.2024 ते दि.09.08.2024 या कलावधीत राखी बनविण्याचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. सदर राखी बनविण्याचे प्रशिक्षणाकरीता स्वयंस्फुर्तीने -22 महिला बंद्यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेले आहे. सदर प्रशिक्षणात रेशमी धाग्यापासून क्रीस्टल मनी, रुद्राक्ष मनी, गोंडयाची इत्यादी विविध प्रकारच्या 670 राख्या तयार करण्यात आलेल्या आहेत. सदर तयार करण्यात आलेल्या राख्या कारागृहाच्या विक्री करीता ठेवण्यात आलेल्या आहेत. सदर राख्या विक्रीतून येणारी रक्कम राखी प्रशिक्षणात सहभागी बंद्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

