जेष्ठ कृषी पदवीधर मित्रांचा दुसरा स्नेह मेळावा
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील सन १९६७ते१९७१या कालावधीत कृषी शिक्षण घेतलेल्या कृषी पदवीधर मित्रांचा दुसरा स्नेह मेळावा कोल्हापूर येथील हाॅटेल ऍट्रिया येथे पार पडला.कृषी पदवी प्राप्तीनंतर तब्बल त्रेपन्न वर्षांनंतर दुर्दम्य आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या आणि वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या मित्रांची दिर्घ कालावधीनंतर गाठभेट झाली.या स्नेह मेळाव्याला मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर, गोवा आणि धारवाड या विविध भागातून एकूण चौसष्ट वर्ग मित्रानी उपस्थिती लावली होती.सर्व मित्रांनी हा दिवस वेगळ्या आनंदात घालविला.महाविद्यालयीन जिवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या परीने शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, कर्नाटक शासन, कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय बॅंका, खाजगी कृषी विषयक संस्था, साखर कारखाने यांचे माध्यमातुन कृषी सेवेत कार्यरत राहिले तर काही मित्रांनी स्वतःची शेती करत राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.या विविध उपक्रमातून आप आपल्या परीने सर्वांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हातभार लावला आहे आणि अजूनही हातभार लावत आहेत.या दिवसभर सर्वजण महाविद्यालयीन काळातील आठवणीत रमून गेले.गप्पागोष्टी हास्य विनोद आणि कौटुंबिक ख्यालीखुशाली विचारणा करण्यात दिवस कधी संपला हे कळलेच नाही.या निमित्ताने आमचे दिवंगत मान्यवर प्रिन्सिपॉल, प्राध्यापक आणि काही वर्गमित्र याना आठवणीने श्रध्दांजली वाहण्यात आली.वर्गमित्रापैकी कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर ज्या वर्गमित्रानी विविध विषयात डॉक्टरेट(पी.एच.डी.) पदवी प्राप्त केली अशा अकरा(११) वर्ग मित्रांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच ज्या वर्गमित्रानी वयाची पंच्याहत्तर(७५)वर्षे पूर्ण केली आहेत अशा बावीस(२२) मित्रांचा सत्कारही करण्यात आला.आमच्या वर्ग मित्रांपैकी डॉ.रघुनाथ घोडके यांनी आय.ए.आर.आय.(IARI)नवी दिल्ली येथून एम.एस,सी.आणि पी.एच.डी.पदवी घेतल्यानंतर देशाला बहूमल्य योगदान दिले
डाॅ.घोडके हे न्यू पापा गीनी या ऑस्ट्रेलिया जवळील देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते तसेच ते डॉ.स्वामीनाथनयांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या नॅशनल कमिशन ऑन फारर्मस याचे सभासदही राहिले आहेत.त्यानी या प्रसंगी सर्व वर्ग मित्राना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गरजाकडे मदत करणे मदत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.विशेषतः शेतकऱ्यांच्या शेतमालास रास्त आणि हमी भाव मिळाला यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे असा आग्रह केला.आमच्या मित्रांपैकी काही जणांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या यावर डॉ.शामराव भगत यांनी समस्यांचे विश्लेषण करून त्यावर सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले.विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शनासाठी लहान लहान गट निर्माण करून अनुभवाची देवाणघेवाण करण्याचा तसेच जेष्ठ नागरिक कृषी संघ स्थापन करून त्याद्वारे शासकीय सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असा ठराव या वेळी संमत करण्यात आला.स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी श्री.अशोक घाटवडे यांनी विशेष परिश्रम घेवून नियोजन केले.तर सुत्रसंचलन डॉ.संभाजीराव शिंदे यांनी केले.प्रास्ताविक शिवराज इंगवले यांनी केले.स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी डॉ.बी.पी.पाटील,शांतिनाथ आवटे, नारायण आलूरकर, नारायण पाटील,भरत कुलकर्णी आणि कोल्हापूरस्थित वर्गमित्रानी मदत केली असे सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.राजाराम संदे यांनी सांगितले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

