“जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपी शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून सहा तासात अटक व गुन्हयातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात यश”
पंकेश जाधव संपादक 7020794626
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.१६/१२/२०२३ रोजी फिर्यादी नामे सौ. सोनाली प्रशांत काकडे वय-३० वर्षे, व्यवसाय- नर्स, रा-दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे यांनी तक्रार दिली की, “मनपा बस स्टेंड येथुन पुणे स्टेशनकडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जात असताना पाठीमागुन स्कुटरवर अंदाजे २०-२५ वर्षांचे दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांचे हातातील काळी पर्स बळजबरीने हिसकावुन चोरी करुन नेली” म्हणुन त्याबाबत शिवाजीगनर पो.स्टे गु.र.नं. २५४/२०२३, मा. द. वि. कलम ३९२.
३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर दाखल गुन्हयातील नमुद अनोळखी इसमांचा तपास चालू असताना शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक श्री. प्रताप साळवे, पोलीस अंमलदार पोहया, ९४७ पवार पो.शि. ४५९२ दडस यांनी समांतर तपास चालू केला. पो.शि. ४५९२ दडस यांना सिसिटीव्ही फुटेजचे आधारे व त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दि. १५/१२/२०२३ रोजी मनपा येथे महिलेला लुटणारे अनोळखी इराग हे जुनी कामगार पुतळा वसाहत, शिवाजीनगर येथे आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने ती बातमी त्यांनी तपासपथकाचे प्रभारी पोलीस उपनिरिक्षक श्री प्रताप साळवे यांना सांगतलेने त्याची खात्री करुन मिळालेली बातमी पो.उ.नि. श्री प्रताप साळवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने, यांना सांगुन त्यांचे आदेशाप्रमाणे व सहा. पोलीस आयुक्त, श्री. वसंत कुवर, मा. संदीपसिंह गिल्ल, पोलीस उप-आयुक्त परि-२, मा. श्री. प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रा. विभागाचे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक श्री प्रताप साळवे, पोलीस अंमलदार पौहवा, ९४७ पवार, पोहवा, ७८३० शेख, पोहवा. ६६४५ काळे, पो.शि. ४५९२ दडस यांनी दोन टिम करुन जुनी कामगार पतळा वसाहत येथील पुलाचे मागे पुढे सापळा रचुन बातमीत मिळालेल्या वर्णनाचा इसम हा एका अनोळखी इसमासह टीव्हीएस गाडीसह थांबलेला असल्याचे दिसल्याने वरील स्टाफचे मदतीने दि. १६/१२/२०२३ रोजी १५/२५ वा. त्यांस जागीच पकडले, तेव्हा त्यांस त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे आदीत्य विजय शिंदे, वय-२१ वर्षे, रा-करपे वाडा, सोमवारपेठ, पुणे असे असल्याचे सांगितले व दुसन्या इसमाने त्याचे नाव गणेश चंद्रकांत कवडे, वय-१९ वर्षे रा-सदानंदनगर, तिसरा मजला, फ्लॅट नं-३२५, मंगळवार पेठ, पुणे असे सांगीतले. त्यांचेकडे सदर दाखल गुन्हयाबाबत तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील वापरलेली स्कुटर ही सुध्दा आरोपीकडुन जप्त करुन हस्तगत करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा कौशल्यपर्ण तपास करुन गुन्हा दाखल झाल्यापासुन सहा तासाच्या आत आरोपी पकडून त्यांना गुन्हयात अटक केली व गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मुद्देमाल व वापरलेले पाहन जप्त करण्यात आलेले आहे. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील असल्याने अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच नमुद गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे हे करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

