पुणे पोलीस विशेष पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! आंदेकर टोळीशी संबंधित आरोपीला कोयत्यासह अटक


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे:-  ता. १० : पुणे शहरातील कुख्यात आंदेकर टोळीतील सक्रिय तसेच फरार आरोपींवर विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले असून, त्याअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-१ आणि फरासखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंदेकर टोळीशी संबंधित एका आरोपीला कोयत्यासह ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी (दि. ९) फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार प्रशांत पालांडे यांना गोपनीय माहिती मिळाली. सिंचन भवन, मंगळवार पेठ, बारणे रोड परिसरात आंदेकर टोळीशी संबंधित एक संशयित व्यक्ती थांबली असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमित खुट्टे आणि प्रशांत पालांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला गुन्हे शाखा युनिट-१ येथे नेण्यात आले. अधिक तपासात त्याचे नाव आदेश अशोक जगताप (वय २४, रा. कसबा पेठ, पीएमसी कॉलनी, पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यातील मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात न्यायालयाने त्याला ५ एप्रिल २०२५ रोजी जामीन मंजूर करताना दोन वर्षांसाठी पुणे शहरात प्रवेशबंदी घातली होती. मात्र, न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता तो पुणे शहरात आढळून आला.
यावेळी त्याची अंगझडती घेतली असता कमरेला लोखंडी कोयता आढळून आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गोहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे व शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे तसेच प्रवीण पासलकर, महेश राठोड, प्रशांत पालांडे आणि सुमित खुट्टे ,मयूर भोसले , अमित जमदाडे व विनोद शिंदे यांच्या पथकाने केली

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!