दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ची धडाकेबाज कारवाई सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या.
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ३०/०१/२०२४ रोजी मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये पो उप निरी शेख, पो.हवा येडे, पो.हवा राठोड ,पो हवा ढगे, पो.ना. लोखंडे से वाहन चोरी प्रतिबंधक चे अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त करीत असताना गस्ती दरम्यान स्टाफ मधील पोना रविंद्र लोखंडे व पो.हवा.आजिनाथ येडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, एका इसमाकडे हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल असून सदरची मोटर सायकल ही चोरीची आहे व सदरचा इसम हा कात्रज तलावच्या जवळउभा आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बाबत मा. वपोनी सो कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने वरील अधिकारी व स्टाफ असे सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता नमूद इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता विकास उध्दव माने वय ३६ रा.मु.पो. माडज ता.उमरगा जिल्हा.धाराशिव सध्या रा.गल्ली नं ३ एस.बी. आय बँकेचे शेजारी, गोकुळनगर कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकल बाबत व कागदपत्रांबाबत चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने व कागदपत्रे दाखवल्याने तसेच सदर मो/सा च्या मुळ मालकाचा शोध घेणे असल्याने त्यास *सी.आर. पी. सी. कलम ४१(१)(ड)* अन्वये ताब्यात घेऊन अटक करुन अटक मुदतीत त्याचेकडून खालील नमूद पो स्टे कडील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) भारती विद्यापीठ पो स्टे, गु र नं. ९३/२०२४, भा. दं. वि. कलम ३७९
२) डेक्कन पो स्टे, गु र नं. १६८/२०२३,भा. दं. वि. कलम ३७९
३) डेक्कन पो स्टे, गु र नं. १४/२०२४, भा. दं. वि. कलम ३७९
असे एकूण ०३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून किं. रू. ३५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाई करिता भारती विद्यापीठ पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील नमूद आरोपी हा पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहनचोरीचे गुन्हे अभिलेखा वरील असून *सदर आरोपीवर यापूर्वी विश्रामबाग,डेक्कन,हडपसर पो.स्टे.असे एकूण १८ वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर पो. आयुक्त सो, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री. अमोल झेंडे, पो उप आयुक्त सो, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री. सुनील तांबे, सहा पोलीस आयुक्त सो, गुन्हे १, पुणे शहर व मा. श्री. विनायक गायकवाड सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी शाहिद शेख, पोना रवींद्र लोखंडे, पो.हवा. आजिनाथ येडे, पो हवा. गणेश ढगे पो.हवा.प्रदीप राठोड ,पो. शि नारायण बनकर यांनी कारवाई केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

