अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली दमदार कामगिरी ! ११,४०,०००/- रू.कि. चे ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ केला जप्त


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०३/०३/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अंमलदार असे समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीवरुन नानापेठ पुणे येथे इसम नामे १) अदीब बशीर शेख, वय २९ वर्षे, रा. पेन्शनवाला मस्जित नानापेठ, पुणे. २) यासीर हशीर सय्यद वय ३० वर्षे, रा. मिठानगर कोंढवा, पुणे यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात एकुण १३,४२,०००/-रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ११,४०,०००/-रू. किं.चे ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्यांचे विरुध्द समर्थ पोस्टे गु.र.नं.४२/२०२५, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, संदिप जाधव, उदय राक्षे, योगेश मांढरे, युवराज कांबळे, तसेच समर्थ पोस्टे कडील पोलीस अंमलदार इम्रान शेख, कल्याण बोराटे यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!