कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात विविध उपक्रमांची व सुविधांची सुरुवात
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 3.4.2024 रोजी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यांसाठी “वॉशिंग मशीन, ई-लायब्ररी, ॲलन फोन कॉल सिस्टीम” इत्यादीचे उद्घटन मा. स्वाती साठे मॅडम, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे व मा. योगेश देसाई सर, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.
“ॲलन फोन कॉल सिस्टीम” – याद्वारे कारागृहातील बंदयांना त्यांचे नातेवाईकांशी बोलण्यासाठी आठवड्यातून “तीन वेळा प्रत्येकी सहा मिनिट” बोलण्याची संधी देण्यात येणार आहे. यामुळे कारागृहातील बंद्यांसाठी त्यांचे नातेवाईकांना जिल्ह्यातील दूरदूरच्या तालुक्यातून किंवा इतर जिल्ह्यातून कारागृहात प्रत्यक्ष भेटीसाठी येण्याकरिताचा प्रवास टाळता येईल व त्यांचे होणारे आर्थिक नुकसान देखील टाळता येईल.
“ई-लायब्ररी” – कारागृहात सुरू करण्यात आली असून कारागृहातील बंद्यांना या ई लायब्ररी द्वारे संगणकावर मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, पंजाबी अशा अनेक भाषांमधील पुस्तके वाचण्यासाठी मिळणार आहेत. या ई लायब्ररी मुळे बंधन मध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी समाजामध्ये अनेक विविध उपक्रम आणि प्रोत्साहन देण्याचे कामकाज चालते कारागृहात देखील कारागृहातील बंद्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवून त्यांना गुन्ह्यांपासून पर्यवृत्त करण्यासाठी कारागृह प्रशासनाचे ब्रीद वाक्य सुधारणा पुनर्वसन यानुसार कामकाज करण्यात येत आहे. यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये देखील अशा कामांसाठी एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे.
“वॉशिंग मशीन युनिट” – कारागृहातील बंदयांना त्यांचे झोपण्याचे बिछाने तसेच अंगावरील कपडे स्वच्छ धुता यावेत, यासाठी कारागृह प्रशासनाने “वॉशिंग मशीन” उपलब्ध करून त्याचे स्वतंत्र युनिट सुरू केले आहे. यामुळे कारागृहातील अति गर्दीमुळे बंद्यांना होणाऱ्या त्वचा रोगाच्या अनेक समस्येवर हा एक चांगला उपाय झाला आहे.
सदर कार्यक्रमास कोल्हापूर कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, सातारा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, नाशिक कारागृह उपअधीक्षक सचिन चिकणे, येरवडा कारागृह उपअधीक्षक रवींद्र गायकवाड, वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी शैला वाघ, वरिष्ठ तुरुंग अधिकारी विजय कांबळे दक्षता पथक, तुरुंग अधिकारी श्रीमती जाधवर, प्रवीण औंढेकर, संभाजी भिसे, अविनाश भोई, रवींद्र पारेकर, माने व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

