मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा खराडी पोलीसांनी केला पर्दाफाश
कुणाल घोडके कार्यकारी संपादक 9860394949
खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि.२१/१०/२०२४ रोजी तक्रारदार नामे आयुष प्रज्ञानंद सातारकर, वय २० वर्षे, धंदा शिक्षण रा. रुम नं डी/१९, साईधाम बिल्डींग भारतीय विदयापीठ कात्रज, पुणे मो.क्र ७०२८४४५०६५ यांनी तक्रार दिली की, दिनांक १८/१०/२०२४ रोजी सांयकाळी ७.०० वा ते रात्री १०.०० वा पर्यत न्यु इंग्लिश फिनेक्स स्कुलच्या समोरील मैदानात, खराडी पुणे येथे अॅलन वॉकर यांचा इव्हेंट (शो) असल्याने त्या ठिकाणी ते सदरचा शो पाहण्याकरीता गेले होते तसेच सदरचा इव्हेंट (शो) पाहण्याकरीता मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी जमली होती त्यादरम्यान अज्ञात चोरटयांनी गर्दीचा फायदा घेवून फिर्यादीच्या खिश्यातील आयफोन १५ प्लस मोबाईल फोन व सदर इव्हेंट (शो) करीता जमलेल्या प्रेक्षकांचे देखील मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरलेले असल्याने चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु र नं ५४१/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास खराडी पोस्टे कडील तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व अंमलदार हे दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपींचा व चोरीस गेले मोबाईल फोनचा शोध घेत असताना, पोशि/९९६७ शेखर शिंदे, पोशि/९९२८ अमोल जाधव व पोशि/४३५२ श्रीकांत कोद्रे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की, वर नमुद गुन्हयातील संशयीत आरोपी हे स्वीट इंडीया चौक, खराडी, पुणे येथे असलेबाबत माहिती मिळल्याने तपास पथकाचे अधिकारी पोउपनि/राहुल कोळपे व पोलीस हवा. ६६११ महेश नानेकर, पोशि ८१४३ सचिन पाटील, पोशि ९०८९ प्रफुल मोरे, पोशि ९९२८ अमोल जाधव पोशि ९९६७ शेखर शिंदे, पोशि ४३५२ श्रीकांत कोद्रे, पोशि/३९३३ सुरज जाधव असे सदर ठिकाणी गेले असता तेथे संशयीत आरोपी नामे १) अखिल व्यंकटरमना गोदावरी वय २४ वर्ष रा. फलकनामा, रंगारेड्डी जिल्हा हैद्राबाद २) सय्यद महमद इद्रीस शेख वय २१ वर्ष रा. मिलनसार सोसा., १२ बिल्डींग जवळ, एस.आर. ऐ, पॅरेमान खार रोड, मुंबई ३) लोकेश हनुमत पुजारी वय ३१ वर्ष रा. घोरपडी गाव, बी.टी. कवडे रोड, शिवदत्त कॉलनी, पुणे ४) पप्पु भागीरथी वैश्य वय ३४ वर्ष रा. शांतीलाल कम्पांउट, जवाहरनगर, खार ईस्ट, मुंबई हे मिळून आल्याने त्यांना खराडी पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांचेकडून विविध कंपन्याचे ०२,३०,०००/- (दोन लाख तीस हजार रुपये) किंमतीचे एकुण १४ मोबाईल फोन हस्तगत करुन इव्हेंन्टमध्ये व गर्दीचे ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा खराडी पोलीसांनी पर्दाफाश करुन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४ श्री. हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग- प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, तपास पथक प्रभारी अधिकारी पोउपनि राहुल कोळपे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, दिलावर सय्यद,सचिन पाटील, प्रफुल मोरे, अमोल जाधव, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

