अट्रोसिटी गुन्ह्यांमधील आरोपीस अटक पूर्व जामीन मंजूर –
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २२/०१/२०२४ रोजी श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम जगभर साजरा करत असताना , हडपसर गोसावीवस्ती या ठिकाणी फटाक्यांचा वर्षाव झाला व फिर्यादी यांच्या घरासमोर फटाके वाजविण्यात आले. फिर्यादी यांनी प्रकरण थांबवत असताना आरोपी यांनी नकार दिला व दोन गटात भांडणे झाली.
जातीवाचक शिवीगाळ झाली, त्याकारणास्तव दोन्ही गटांविरोधात हडपसर पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि. 323,324,143,147,149,504,506 व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ – 3(1) आर ,3(1) एस अंतर्गत गुन्हा नोंद झाला.
त्यातील शुभम पवार आरोपीच्या वतीने ॲड. शुभम लोखंडे यांनी युक्तिवाद केला व पुरावे कोर्टासमोर सादर केले असता, मा. जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शुभम पवार याचा अटक पूर्व जामीन मंजूर केला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

