शादी डॉट कॉम या वेबसाईटवरून महिन्याची ३कोटी १६लाख रुपयाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक.
पुणे ब्युरो चीफ- डॅनियल ॲनथोनी ७८९६२७३९४५
साइबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी :(ता.११)शादी डॉट कॉम या मेट्रोमोनियल वेबसाईटवरून एका महिलेशी संपर्क साधला तिला लग्नाच्या वेळेस दाखवले आणि चक्क तिला ३कोटी १६लाखाला फसवले ,मात्र पिंपरी चिंचवड सायबर सेल पोलिसांनी या तीन भामट्यांना दिल्ली हरियाणा बॉर्डर येथून अटक केली आहे.
१)रंजीत मुन्नालाल यादव (वय २७वर्ष )२)सिकंदर मुन्ना खान (वय२१ वर्ष )३)बबलू रघुवीर यादव (वय२५वर्ष सर्व रा.सुकरा बाजार ,मंडी गाव ,पोस्ट जोनापुर दिल्ली )अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेची शादी डॉट कॉम या वेबसाईटवरून ३कोटी १६लाख ७८हजार ११४रुपयाची आर्थिक फसवण करण्यात आली होती .आपण एका मोठ्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कामाला असल्याची खोटी माहिती संबंधित पीडित महिलेला देऊन लग्नाच्या आम्ही दाखवले आणि तिचा विश्वास संपादन करण्यात आला .नंतर आपल्याला व्यवसायामध्ये समस्या निर्माण झाली असून कच्चा माल खरेदी करण्यासाठी, आजारपणाच्या उपचारासाठी ,बँक खाते रेग्युलर राइज करण्यासाठी ,कर्ज फेडण्यासाठी अशा विविध कारणे सांगून कोट्यावधी रुपये उकळले सदर व्यवहारीक १०जुलै २०२३ता,९सप्टेंबर २०२४ या दरम्यान झालेला आहे.
एवढी मोठी रक्कम देवूनही ती परत न केल्याने आपल्या आर्थिक फसवणूक झाली असल्याचे संबंधित महिलेच्या लक्षात आले.
सायबर सेल पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा तपास करीत असताना काही महत्त्वाचे मुद्दे तपासले .वेगवेगळ्या ८१बँकेतून ही रक्कम ट्रान्सफर करून पुढे ३००ते ४००बँक खात्यावर हे पैसे ट्रान्सफर केले असल्याची माहिती प्राप्त झाली .अधिक बँक खाते ही दिल्ली येथे असल्याचे आढळून आल्याने पोलीस निरीक्षक सागर पोमण हे पथकासह दिल्ली येथे रवाना झाले.
आरोपीचा शोध घेत असता त्यांनी एकूण ११बँक खाते एकाच पत्त्यावर काढले असल्याचे दिसून आले .आरोपी तेथे दोन वर्षांपूर्वी राहत होता.त्यांनी त्यांचे मोबाईल फोन देखील बदललेले होते ,परंतु या गुन्ह्यातील आरोपी सिकंदर मुनी खान (रा.मांडी विलेज दिल्ली )यास दिल्ली हरियाणा बॉर्डरवरील मांडी व्हिलेज या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले.नंतर त्याचे दोन साथीदार रणजीत यादव आणि बबलू यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले .मॅट्रिमोनियल साईट वरून परदेशी नागरिक असल्यास नागरिकांनी समक्ष भेटून चौकशी करूनच वैयक्तिक माहिती शेअर करावी.
तसेच मेट्रोमिनीयलवरून पैशाची मागणी करत असल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असे आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे .आरोपी हे इंस्टाग्राम कॉलचा वापर करीत होते .तसेच बँक खाते उघडण्यासाठी तात्पुरत्या भाडे करार केला होता आरोपी बबलू यादव हा आरोपींच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या एटीएममधून पैसे काढून पहिले आरोपी यांना देत होता .आरोपी रणजीत यादव यांनी त्याच्या पंजाब नॅशनल बँक खात्यावर गुन्ह्यातील ३६लाख ९६हजार ६७२रुपये घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सह आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर ,अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड ,पोलीस उपायुक्त (गुन्हे)संदीप डोईफोडे ,पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार ,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी उपनिरीक्षक सागर पोमण,वैभव पाटील ,पोलिस अंमलदार सुभाष पाटील ,दीपक माने ,कृष्णा गवळी, अभिजीत उकिरडे ,संतोष सपकाळ ,दीपक भोसले ?नितेश बिचेवार ,श्रीकांत कबुले,अतुल लोखंडे ,माधव आरूटे,ज्योती साळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव