चाकूचा धाक दाखवून कंपनि कामगारांना लुटणारे 02 आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनने केले 48 तासांत जेरबंद
बालाजी शिंदे / रवी गायकवाड पुणे प्रतिनिधी
रांजणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे दि 07/11/2025 रोजी सांयकाळी 07-00 वा सुमारास खेमसिंग पुरुषोत्तमसिंग सर्राट राहणार ढोकसांगवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, मूळ राहणार भेडवाटोला, तहसील कोतमा, जिल्हा अनुपपूर, राज्य मध्य प्रदेश है त्याचे मित्रा सोबत कंपनित कामा करीता पायी जात असताना त्यांना अज्ञात दोन आरोपी यांनी शिवीगाळ, दमदाटी करून चाकु गळ्याला लावून त्यांच्याकडील 8,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून जबरीने चोरून येऊन गेले असले बायत सोमसिंग सरटी यांचे फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदरचा प्रकार मंभिर स्वरुपाचा असल्याने पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो कॉ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर, यांना गुन्हा अडकिस आणणे करीता योग्य त्या सुचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटणास्थळा वरिल सीसीटिव्ही कॅमेरे, तसेच तांत्रिक विश्लेषनाचे आधारे आरोपी १) सौरभ बाळकृष्ण शेलार वय 25 वर्षे रा कोरेगाव, ता शिरुर जि पुणे, मुक य पवन नगर झापवाडी ता सिन्नर जि नाशिक २) मनिष भास्कर काळबांडे वय 23 वर्षे रा कोरेगाव, फलकेमळा, तुकाराम फलके यांचे खोलीत ता शिरूर जि पुणे, मुळ से ढाबा ता वडनेस जि अमरावती यांना दि 11/11/2025 रोजी जिताफिने अटक करण्यात आले असुन, आरोपी कडे कौशल्यपुर्वक तपास केला आरोपींनी गुन्डा केल्याची कबुली देवुन तपासात जबरीने चोरी केलेले 60,000/- रु किमतीचे 04 मोबाईल त्यायें कडुन जप्त करून गुन्हा करणे करीता वापरलेला चाकु हा देखील जप्त करण्यात पोलीसांना यश आले असुन, त्यांचे कडुन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील दोन गुन्हे उपङकिस आणण्यात आले आहे
सदरची कामगिरी ही मा पोलीस अधिक्षक श्री संदिपसिंह गिल्ल सो, मा श्री रमेश चोपडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा श्री प्रशांत ढोले सो, उपविभागिय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरुर, यांचे मार्गदर्शना खाली श्री महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो कॉ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर पो हवा विजय सरजिने यांनी केली आहे सदर गुन्हायाचा तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पो हवा विजय सरजिने हे करीत आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

