रेकॉर्डवरील गुन्हयातील आरोपीतास ०१ गावठी पिस्टल ०२ जिवंत काडतुसासह केले जेरबंद
विनोद पिसाळ पुणे प्रतिनिधी
युनिट-३ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१४/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, मारुती पारधी, अमोल काटकर, कैलास लिम्हण, तुषार किंद्रे. पुरुषोत्तम गुन्ला असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता कोथरुड, वारजे, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत खडकवासला धरण ब्रिज येथे आले असताना पोलीस अमंलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे गणेश सतिश रणखांब वय ३५ वर्ष, रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे हा त्यांचेकडे अवैधरित्या बेकायदेशिर त्यांचे ताब्यात ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस बाळगलेले असताना त्याला सिंहगड श्रृष्टी जवळ, टि पॉईन्ट चौक, एनडीए खडवासला कडे जाणा-या रोड च्या लगत असलेल्या टपरीजवळ पुणे येथुन सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन योग्य ती कायदेशिर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार प्रभारी पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, श्री. संपतराव राऊत, सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, मारुती पारधी, अमोल काटकर, कैलास लिम्हण, मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला यांनी कामगिरी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

