, पुणे शहर घरफोडीचा गुन्हा उघड करुन आरोपीस सांताक्रुज मुंबई येथून केले जेरबंद
राजशेखर जाधव पुणे प्रतिनिधी
युनिट-२ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १४/११/२०२५ रोजी संमती को-ऑपरेटिव्ह सोसायटी, आगरकरनगर पुणे येथे अज्ञात इसमाने घरफोडी चोरी केलेबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. ३४६/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५, ३३१, (२) (४) अन्वये दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील प्रभारी अधिकारी संतोष सोनवणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक आदलिग व पोलीस अंमलदार तसेच ए डि एस १ पथक प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे व पोलीस अंमलदार असे करीत असताना सी.सी.टि.व्ही फुटेजमध्ये संशयित इसम आढळून आला. नमुद इसमाचा सी.सी.टि.व्ही फुटेजवरुन पुढे शोध घेत असताना सदर इसम हा पुणे रेल्वे स्टेशन येथून कॅबने मुंबईकडे जाताना दिसून आला. अधिक तपास केला असता तो मुंबई चेंबुर येथे उतरल्याची माहिती प्राप्त झाली.
गुन्हे शाखा युनिट २ कडील सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांना कॅब चालकाने दिलेल्या माहितीवरुन त्यांनी सदर इसमाबाबत अधिक माहिती घेतली असता तो मुंबई वाकोला पोलीस स्टेशनचे हद्दीत असलेबाबत माहिती प्राप्त झाली.
गुन्हे शाखेकडील वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक आदलिंग हे पोलीस अंमलदार यांचे पथक मुंबई येथे गेले असता वाकोला पोलीस स्टेशन, मुंबई येथून स्थानिक पोलीस मदत घेवून नमुद घरफोडी करणारा आरोपी नामे राजकिरण अनिल जाधव वय २५ वर्ष रा. सांताक्रुज पुर्व मुंबई यांस ताब्यात घेवुन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयात नमुद आरोपीस दि.१५/११/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे अधिक तपास चालु आहे. सदर आरोपी हा रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्र व आंध्रप्रदेश मध्ये घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, ए डि एस १ चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे तसेच सहा. पोलीस निरीक्षक कवठेकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक आदलिंग, पोलीस अंमलदार कुंभार, चव्हाण, तांबोळी थोरात, राठोड, शिंदे, लोखंडे, जाधव, मोकाशी, टकले, पवार, राख सरगर, मांढरे, नेवसे, ताम्हाणे, दळवी, आबनावे, शेख व वगारे असे गुन्हे शाखा युनिट २ व एडी एस १ पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

