भारती विद्यापीठ पोलीसांनी कैाशल्युपर्ण कामगिरी ! 54 ग्रॅम 51 मिलीग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करुन दोन आरोपींना अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक 31/08/2024 रोजी मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रेालींग करीत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे,सचिन गाडे,सचिन सरपाले यांचे बातमीवरुन नवले पुलाकडुन कात्रजकडे जाणा­या हायवेवरील राजमाता उदयान समोरील रोडवर इसम नामे 1. मल्लीनाथ बसवराज गौडगाव,वय 29 वर्षे,रा.चंद्रभागानगर,भोसले यांचे बिल्डींगमध्ये आंबेगाव बु,पुणे मुळ जि.सोलापुर* 2 .नैाशाद अब्दुलअली शेख,वय 36 वर्षे,रा.पडेगाव, औरंगाबाद(संभाजीनगर)त्यांचे ताब्यात *एकुण 11,90,200/-रुपयांचा माल त्यामध्ये 2,45,400/- रुपयांचे 12 ग्रॅम 27 मिलीग्रॅम* वजनाची पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन (एम.डी.) व *8,44,800/- रुपयांचे 42 ग्रॅम 24 मिलीग्रॅम* वजनाची पांढरट रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन (एम.डी.) असा *एकुण 54 ग्रॅम 51 मिलीग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ अनाधिकाराने,बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले आहे.म्हणुन त्यांचेविरुध्द पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी सरकारतर्फे दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन,पुणे शहर गुन्हा रजि नंबर 716/2024 एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम 8(क),21(क),29 अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये नमुद दोन्ही इसमांना अटक केली आहे.अटके दरम्यान आरोपींकडे मेफेड्रॉन (एम.डी.) हा माल कोठुन आणला आहे याचा तपास करता त्याने सदरचा माल औरंगाबाद येथून आणला असुन सदर आरोपी याचा शोध चालु आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुकत,पश्चिम प्रादेशीक विभाग,पुणे,श्री.प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2,श्रीमती स्मार्तना पाटील, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी,यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे,सचिन सरपाले,अभिनय चौधरी,सागर बोरगे,शैलेश साठे,नामदेव रेणुसे,महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे,मंगेश पवार,अवधुत जमदाडे,सतिश मोरे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमाले,यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!