वाघोली येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील ०५ पाहिजे आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा यूनिट ६ पुणे शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अंमलदार हे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना समीर पिलाने, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पो.स्टे.गु.र.नं. ७३४ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२),१४०(३),३५१(२) या गुन्हयातील पाहिजे आरोपी कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर, विकास कांबळे हे आव्हाळवाडी गावचे हद्दीत आव्हाळवाडी ते खराडी रोडवरील बायफ कंपनीजवळ लाल रंगाचे स्वीफ्ट गाडीसह उभे आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी मिळताच स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन त्यांना शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे १) कुमार मोहन पवार, वय २२ वर्षे, रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे २) नितीन मोहन पवार, वय १९ वर्षे, रा.मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे ३) ओम लक्ष्मण गव्हाणे, वय १९ वर्षे, रा. लेन नं. २. साई सत्यम पार्क, उबाळेनगर, वाघोली, पुणे ४) मनोज सुखदेव निंबाळकर, वय २१ वर्ष. रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे ५) विकास दिगंबर कांबळे, वय २१ वर्षे, रा. लेन नं. २६ उबाळेनगर, वाघोली, पुणे त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार तपासकामी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन केले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा.पोलीस सह-आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २ सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश ताकवणे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

