अल्पवयीन मुलीशी फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून, तिला धमकावून, तिचे न्यूड फोटो प्रसारीत करणा-या बिहारीस मार्केटयार्ड पोलीसांनी बिहार मध्ये जावून ठोकल्या बेडया
पंकेश जाधव संपादक 7020794626
मार्केट यार्ड पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- फिर्यादी यांची मुलगी हिचे बरोबर ऑन लाईन फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून रान २०२३ मध्ये फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हिला जिवे ठार मारील अशी धमकी देवून, तिथे न्यूड फोटो व्हाट्सअॅप व्दारे त्याला पाठविण्यास भाग पाडून त्यावेशी रिलेशनशिप मध्ये नाही राहिली तर ते फोटो तिच्या नातेवाईकांना पाठविल अशी वेळोवेळी धमकी देवून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे न्यूड फोटो पाठवले असल्याने आरोपी याचे विरूध्द मार्केटयार्ड पो. ठाणे गु.र.नं. २७८/२०२३, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधि. सन २०१२ चे कलम ११.१२. भा.द.वि. कलम, ३५४,३५४ (ड), तसेच आय.टी, अॅक्ट ६६ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेवर गुन्हयातील आरोपीचे पुर्ण नाव व पत्ता माहित नसताना फक्त ०४ मोबा, क्र. तक्रारीत नमुद असल्याने मोबा. क्र. चे तांत्रिक विश्लेषण केल्यावर आरोपीचा बिहार मधील अपूर्ण पत्ता मिळून आला. परंतू त्या नंतर सतत मोबा. क्र. चे क्लिष्ट तांत्रीक विश्लेषण करून हरपुर, जि. बेगुसुराय, राज्य बिहार असे लोकेशन येत असल्याने तपासी अधिकारी स्वप्नाली शिंदे, पो. हवा. किशोर पोटे, पो. हवा. अमित जाधव, म.पो.हवा. धनश्री गोफणे असे तात्काळ बेगुसुराय बिहार येथे रवाना झाले. तेथे त्यांनी वेषांतर करून आरोपीची सर्व माहिती घेतली व त्यानंतर बिहार पोलीसांच्या मदतीने संवेदनशिल भागातून आरोपी अमनकुमार पंकज तांटी वय. २० वर्षे धंदा. शिक्षण रा. वॉर्ड नं. ११, हरपुर जि. बेगुसुराई, राज्य बिहार यास रिफायनरी ओ. पी. (बरौली थाना) यांचे मदतीने शिताफिने अटक करून गुन्हयात वापरलेला मोबा, फोन हस्तगत केला.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व विभाग पुणे शहर श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परि. ०५ श्री आर. राजा., मा. सहा. पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) श्री शाहूराजे साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेशसिंग गौड, मार्केटयार्ड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वप्नाली शिंदे, पो.हवा. किशोर पोटे, पो. हवा. अमित जाधव, म.पो. हवा. धनश्री गोफणे यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

