*दोन अल्पवयीन मुलांकडून शंकर महाराज मठ धनकवडी येथील 3 चोरीच्या दुचाकी सह ताब्यात घेतले…


पंकेश जाधव संपादक 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.११/०१/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना सहकारनगर पोलीस स्टेशनचे हददीतील शंकर महाराज मठ भागात दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांच्या दुचाकी लावण्यासाठी पार्कींगची सोय करण्यात आली आहे. त्या पार्कीगमधुन दुचाकी चोरी हावु नये यासाठी सदर भागात तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला असता दोन मुले त्यांचेकडील हिरो होंडा स्प्लेंडर गाडी नं.MH-13- AS-9144 ही घेवुन सदर ठिकाणी आले व त्यांनी त्यांची गाडी महेंद्रा शोरुमचे इमारती समोर पार्क करुन ते बर्गर किंग समोरील पार्किंग जागेत आले व तेथे पार्क केलेल्या दुसऱ्या दुचाकी वाहनांना त्यांचेकडील चावी लावुन हॅण्डल लॉक काढण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांचा पोलीस स्टाफला संशय आल्याने सर्वांनी एकमेकांना इशारा करुन दोन्ही मुलांना त्यांचेकडील गाडीसह ताब्यात घेवुन त्यांना गाडीबाबत व तीचे कागदपत्राबाबत विचारता ते उडवा उडवीची उत्तरे देवुन लागल्याने त्यांना त्यांचे ताब्यातील गाडीसह सहकारनगर पोलीस स्टेशन येथे घेवुन आलो व त्यांचे पालकांना संपर्क करुन पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेतले.त्यांना विश्वासात घेवनु चौकशी केली असता त्यांनी त्यांचेकडील गाडी चोरीची असल्याची कबुली देवुन मागील तीन चार दिवसापूर्वी आम्ही दोघांनी वर्गर किंग या दुकाना समोरून आणखी दोन दुचाकी आमचे कडील डुब्लीकेट चावीने चोरी करुन इकडे तिकडे फिरवुन मौजमजा करुन त्या के. के. मार्केटचे पलीकडे असलेल्या लोअर इंदीरानगर बिबवेवाडी भागातील नाल्याजवळ पार्क करून ठेवल्या आहेत. असे सांगितल्याने त्यांचेकडुन एकुण १,१०,००० रूपये किंमतीच्या एकुण ०३ दुचाकी गाडया हस्तगत करण्यात आल्या असुन सहकारनगर पोलीस स्टेशन कडील १) गुन्हा रजि. नं.१०/२०२४ भादवी. कलम ३७९ २) गुन्हा रजि. नं.११/२०२४ भादवी. कलम ३७९ ३) गुन्हा रजि.नं.१२/२०२४ भादवी. कलम ३७९ असे एकुण तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

Advertisement

सदर विधीसंघर्षित बालकाकडे चौकशी केली त्या दरम्याने त्यांनी दुचाकी फिरवण्याची हौस होती परंतु घरी दुचाकी नाही आणि विकत घेऊ शकत नाही म्हणुन दुचाकी चालवण्याची हौस भागवण्यासाठी वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त सोो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सोा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सोो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतारे, बजरंग पवार, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, विशाल वाघ, सागर कुंभार, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!