लष्कर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अंमलदार यांनी अवघ्या अर्ध्या तासात एका शेतकऱ्याचे रिक्षामध्ये हरविलेले ५०,०००/- रोख रक्कम व ३ लाख रुपयाचे चेक परत मिळवून देऊन केली दमदार कामगिरी
पंकेश जाधव संपादक 7020794626
लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि. १२/०१/२०२४ रोजी सायंकाळी ७/०० वाच्या सुमारास एक इसम तक्रार देणेकरीता आला असता त्याने सांगितले की, एका रिक्षामधुन प्रवास करीत असताना बॅगेमध्ये ५०,०००/- रोख रुपये व ३ लाखाचा चेक राहिला आहे. तसेच इतर महत्वाचे कागदपत्रे राहिले आहेत. असे कळविल्यावरुन तात्काळ सदर बाब मा. वपोनि दशरथ पाटील यांना अवगत करुन मा. वपोनि सर यांनी तात्काळ तपास पथकास शोध घेणेबाबत आदेश दिल्याने तपास पथकातील अंमलदार पोहवा शिंदे, पोना मांजरे व पोशि हराळ असे मिळुन सदर रिक्षा चा शोध घेणेकामी रवाना झाले. सीसीटीव्ही फुटेज वरुन सदर रिक्षाचा नंबर मिळवुन नंबर वरुन रिक्षाचालकाचा पत्ता व मोबाईल नंबर मिळवुन सदर रिक्षा चालकास कॉल करुन विचारणा केली असता त्याने रिक्षा मध्ये पाहणी केली असता त्याला एक बॅग मिळुन आली. त्यास लागलीच पोलीसांनी सदरची बॅग पोलीस स्टेशन ला घेऊन येण्यास सांगितले असता सदर रिक्षा चालक नामे मनोहर मारुती शिंदे रा. राजेद्र नगर नवी पेठ पुणे हे लष्कर पोलीस स्टेशन ला आले. सदर बॅग ची पाहणी केली असता सदर बॅग मध्ये ५०,०००/- रोख व ३ लाखाचा चेक व इतर महत्वाचे कागदपत्रे जसेच्या तसे मिळुन आले. शेतकऱ्याचीच बॅग असल्याची खात्री झाल्याने सदर ची बॅग ही शेतकरी नामे अभिजीत शांतवन बनसोडे रा. वडगाव शेरी पुणे यांना मा. सहा. पोलीस आयुक्तसो यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली आहे. तसेच सदरचे शेतकऱ्याने खुश होऊन रिक्षा चालकास योग्य ते बक्षिस अदा केले आहे. शेतकऱ्याला त्याची हरविलेली बॅग परत मिळाल्याने चेहऱ्यावर आनंदाचे हास्य होते. तसेच पोलीसांनी तत्परतेने मदत केलेने पोलीसांचे देखील आभार मानले.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्तसो रितेश कुमार सर, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सर, मा. पोलीस उपायुक्तसो परि-२ स्मार्तना पाटील मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्तसो संजय सुर्वे सर, मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक दशरथ पाटील सर, मा. पोलीस निरीक्षक ( गुन्हे) प्रियांका शेळके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोउनि गायकवाड, पोहवा शिंदे, पोना मांजरे, पोशि हराळ यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

