घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस ताब्यात घेवुन ०५ गुन्हे आणले उघडकीस
आकाश पांचाळ सहसंपादक
गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १२/१०/२०२५ रोजी युनिट ०६ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून चोखीढाणी जवळ, खराडी रोड, वाघोली, पुणे येथुन आरोपी नामे बिरजू राजपूतसिंग दुधानी, वय ४० वर्षे, रा. रामटेकडी, वानवडी, पुणे यास नंबर प्लेट नसलेली मारूती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार या चोरीचे गाडीसह ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याच्याकडे घरफोडीचे गुन्हयांतील वेगवेगळया वर्णनाचे सोन्याचे दागिणे मिळुन आले. आरोपीकडून चोरीची स्विफ्ट गाडी व सोन्याचे दागिणे असा एकुण २१,४०,०००/-रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमुद आरोपी हा मोक्का गुन्हयात जामिनावर सुटलेला असुन त्याचेवर मुंढवा पोलीस स्टेशन येरवडा पोलीस स्टेशन, चिखली पोलीस स्टेशन, भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, संत तुकारामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखा श्री. वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ गुन्हे शाखे कडील सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव