आर्मीतील माजी जवानाकडुन ४,२६,०००/- रु. कि. चे सोन्याचे दागिन्याची चोरी
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महापोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मुंढवा पोलीस स्टेशन, गु.र.नं. २६०/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ (अ) मधील फिर्यादी हया दिनांक २६/०९/२०२५ रोजी ते दिनांक ३०/०९/२०२५ दरम्यान त्याचे मुलासह नातेवाईक यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर फिर्यादी याचे राहते प्लॅटचे चावीचा वापर करुन, कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे बेडरुममधील लोखंडी पेटी (ट्रेक) मध्ये ठेवलेले ४,२६,०००/- रु.कि. चे सोन्याचे दागिने चोरुन नेलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादी यांचे पती है आर्मीमध्ये नोकरी असुन ते सध्या चेन्नई येथे कार्यरत आहे. सदर गुन्हयाचा तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर याचेकडे देण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अधिकारी राजु महानोर व तपास पथकातील पोलीस अंमलदार याचे करवी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाडताळणी करुन, दाखल गुन्हयाचे अनुषंगाने संशयीत इसमाचे मोबाईल फोनचे सीडीआर व एसडीआर प्राप्त करुन, मिळालेल्या माहीतीचे तांत्रिक विश्लेषण करुन, सदरचा गुन्हा आरोपी संदीप सुरेश चव्हाण वय ४३ वर्षे रा. साईसिध्दी कॉलनी, आदर्शनगर, जय महाराष्ट्र कॉलनी समोर, घर नंबर १०१, दिघी पुणे यांने केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. आरोपी हा यातील फिर्यादी यांचा नातेवाईक असुन, तो देखील यापुर्वी आर्मीमध्ये त्याचे पती सोबत नोकरीस असल्याची माहीती मिळाली. सदर आरोपीने ओळखीचा फायदा घेवुन, फिर्यादी घरात नसल्याचे माहीती मिळाल्यानंतर फिर्यादी याचे घरातुन सोन्याचे दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यास सदर गुन्हयाचे कामी दिनांक १३/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे, मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती माया देवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस अंमलदार राजु कदम, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, राहुल मोरे, शिवाजी धांडे, रुपेश तोडेकर, अक्षय धुमाळ व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव