फुरसुंगी पोलीसांची धडक कारवाई, चोरटयाकडून १,२५,५०० रुपयांचा गुन्हयातील मुद्देमाल जप्त
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर
महापोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :– फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.क्र. ३५०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये दि.१२/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील आरोपी याचा शोध घेणेकामी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश नलवडे, पोहवा हरिदास कदम, पोलीस अंमलदार तुकाराम गुरव, दयानंद कांबळे, महेंद्र सोरटे, रामकिशन हंवर्डे आणि प्रमोद ढाकणे असे पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत होते. घटनास्थळावरील प्राप्त माहीतीप्रमाणे अनोळखी आरोपीचे वर्णन मिळाल्याप्रमाणे आम्ही शोध घेत असताना पोलीस अंमलदार दयानंद कांवळे व महेंद्र सोरटे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार महादेव मंदिराच्या पाठीमागे, वडकी परिसरात वरील गुन्हयातील वर्णनाचा एक संशयित इसम कोणाचीतरी वाट पाहत थांवलेला असलेची माहिती मिळाली. मा. वरिष्ठांचे आदेशाने वरील पोलीस अधिकारी व पथक तात्काळ बातमीचे ठिकाणी जाऊन पाहणी करता संशयीत वर्णनाचा इसम दिसून आंला. त्यास पोलीसांची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याचे तयारीत असताना पोलीस पथकाने पाठलाग करून ताव्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रसाद राहूल यशवंत, वय २० वर्षे, रा. वडकीगाव, ता. हवेली, जि. पुणे असे असल्याचे सांगून विश्वासात घेवून तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. अटक आरोपीकडे तपासामध्ये गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालासह गुन्हयात वापरलेली अॅक्टीव्हा दुचाकी असा एकुण १,२५,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर दुचाकीवावत अधिक तपास केला असता ती चोरीची असून सदरबावत हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. १२५९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील पोलीस पथकाकडून एक घरफोडीचा व एक दुचाकी चोरीचा असे एकुण दोन गुन्हयांची उकल करण्यात यश आले आहे.
सदर गुन्हयाचा तपास सतीश खुरंगे, पोलीस हवालदार, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, राजेश खांडे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक विष्णु देशमुख, महेश नलवडे, तेहसिन वेग पो. हवालदार हरिदास कदम, पो. अंमलदार दयानंद कांबळे, महेंद्र सोरटे, रामकिशन हंवर्डे, प्रना५ ७ाफण, तुकाराम गुरव, आणि कुंटेवाड यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव