” रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांनी प्रवाशाचा विरसलेला लॅपटॉप केला परत, प्रेरणादायी व कौतुकास्पद कामगीरीव्दारे मानुसकीदर्शन “
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १५/१०/२०२५ रोजी संध्याकाळी ०७/१५ वा. चे सुमारास एम. आय. टी. कॉर्नर येथुन एम. आय. टी. कॉलेज मध्ये इंजीनीअरींगचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी नामे अर्थ किशोर पिंपरे रा. एम. आय. टी. कॉलेज हॉस्टेल, लोणी काळभोर पुणे हे बकोरी फाटा, वाघोली येथे जाणेसाठी रिक्षा नंबर एम. एच. १२ टी. यु. ०८२२ यामध्ये बसुन गेले होते. बकोरी फाटा येथे अर्थ पिंपरे हे रिक्षातुन खाली उतरले आणि घाईने वाघोलीचे दिशेने निघुन गेले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर अर्थ पिंपरे यांचे लक्षात आले की, त्यांची लॅपटॉप ची बॅग सदर रिक्षामध्येच ते विसरले आहेत. परंतु त्यांचेकडे रिक्षानंबर नसल्याने ते पुढे काहीही करु शकले नाही.
तदनंतर अर्थ पिपरे हे पुन्हा लोणी काळभोर येथे आले व त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे त्यांची लॅपटॉप बॅग एका अनोळखी रिक्षामध्ये ते विसरले असलेबाबत सांगुन शोध होणेबाबत विनंती केली. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री कृष्णा बाबर तसेच पोलीस अंमलदार पो.शि. राहुल कर्डीले व पो. शि. प्रशांत सुतार यांना एम. आय. टी. कॉर्नर भागातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार त्यांनी रिक्षाचा शोध घेणेची कार्यवाही सुरु केली.
त्यादरम्यानच अर्थ पिंपळे यांना सदर रिक्षाचे रिक्षाचालक श्री मोहन गणपती चंदनशिवे वय ३२ वर्षे धंदा रिक्षा ड्रायवर रा. धुमाळमळा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांनी विद्यार्थी नामे अर्थ पिंपरे यांचे मोबाईलवर फोन केला व त्यांची लॅपटॉप बॅग रिक्षामध्ये मिळून आली असल्याचे कळवीले. तदनंतर सदर रिक्षाचालक व विद्यार्थी या दोघांनाही लोणी काळभोर पोलीस ठाणेस बोलावुन त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, रिक्षाचालक यांना अर्थ पिपरे यांनी गुगल पे व्दारे रिक्षाचे भाडे दिले होते. त्यामधील ट्रान्जक्शन आय. डी. वरुन त्यांनी त्यांचे मीत्राचे मदतीने अर्थ पिंपरे यांचा मोबाईल नंबर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्राप्त केला व त्यांचेशी संपर्क साधुन लॅपटॉप बेंग लॅपटॉपसह त्यांना परत केला आहे.
रिक्षाचालक नामे श्री मोहन गणपती चंदनशिवे वय ३२ वर्षे धंदा रिक्षा ड्रायवर रा. धुमाळमळा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांनी मानुसकीचे दृष्टीकोनातुन केलेले अतीउत्कृष्ठ कामगीरीबाबत त्यांचा लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वतीने सत्कार करुन त्यांचे कौतुक करणेत आले आहे. त्यांची अशाप्रकारची कौतुकास्पद कामगीरी ही, समाजातील सर्व नागरीकांना प्रेरणादायी आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव