श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करावा – किशोर गंगावाल यांचे मागणी
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन शिर्डी :- चारही गेट जवळ मोबाईल आणि चप्पल स्टँडअसावे व चारही गेट जवळ सशुल्क दर्शन पास व्यवस्था असावी श्री साईबाबामंदिराचे चारही गेट कोरोना महामारी मध्ये बंद करण्यात आले होते. त्यानंतरशिर्डी ग्रामस्थांनी वेळोवेळी उठाव केल्यानंतर गेट नंबर तीन हे अंशतः खुलेकरण्यात आले. या गेटमधून फक्त काही ठराविक ग्रामस्थांना आंत प्रवेश दिला को-जातो, मात्र सर्वसामान्य साईभक्तांना या प्रवेशद्वारातून आंत मध्ये जाण्यास मनाई आहे. तसेच दिव्यांग वयोवृद्ध साई भक्तांना शेजारील अडचणीच्या गेटनेआत सोडले जाते. व्हीआयपी साई भक्तांना गेट नंबर दोन मधून आत बाहेरजाऊ दिले जाते. तर गेट नंबर चार मधून संस्थान कर्मचारी व अधिकाऱ्यांनाआत व बाहेर जाण्यास मुभा आहे. तसेच गेट नंबर एक कायमस्वरूपी बंद करून गेट नंबर पाच ने भाविकांना बाहेर सोडले जाते.
साईभक्तांना व ग्रामस्थांना मंदिर परिसरातील शनिदेव, महादेव, गणेश मंदिर, दत्त मंदिर,नंदादीप, ध्यानमंदिर व गुरुस्थान आदी ठिकाणी दर्शनाला जाणे साठी संपूर्ण दर्शन रांगेतून समाधी मंदिर द्वारे वरील ठिकाणी जावा लागते. त्यामुळे एवढ्या मोठ्या दर्शन रांगेतून एकदा गेलेला भक्त पुन्हा आत जाण्यास धजावत नाही. शिर्डीत दोन दिवस मुक्काम करून पूर्वीप्रमाणे मंदिर परिसरात शांतपणे बसावे, बाबांचे नामस्मरण करावे, अशी अनेक भाविकांची मनस्वी इच्छा
असते. परंतु चुकीच्या नियोजनामुळे भक्तांना एकाच दिवसात शिर्डीतून बाहेर जावे लागते. या प्रश्नी भाविकांची मोठी नाराजी दिसून येते त्याचा परिणाम शिर्डीतील व्यावसायिकांच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या सर्व गोष्टी ग्रामस्थांनी वेळोवेळी साईबाबा संस्थान प्रशासनातील अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु अधिकारी याबाबत योग्य तो निर्णय
घेण्या ऐवजी याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. तसेच साई उद्यान इमारतीत लाडू काउंटर व सशुल्क दर्शन पास व्यवस्था सुरू करावी, गर्दी कमी असतांना भक्तांना पूर्वीचे १६ गुंठे शेजारील गेटने दर्शनास सोडावे, जेणेकरून भक्तांना साई समाधीचे वेळेतच दर्शन होईल.
तसेच चारही गेट मधून भाविकांना दर्शनासाठी आत बाहेर जाण्यास खुले करावे, या संदर्भात निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने भव्य मोर्चाद्वारे शुक्रवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ठीक १० वाजता मारुती मंदिराजवळ उपस्थित रहावे ही विनंती.
Cheif Editor : Pankesh jadhav