ज्येष्ठ नागरिक कुटूंबापासून लांब राहत असल्याचा फायदा घेवून, त्यास व्यसानाच्या आहारी नेवून २४ लाखांची ऑनलाईन ट्रांजेक्शन करून फसवणूक करणाऱ्या दोघांना हडपसर पोलीसांकडून अटक


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे:- फिर्यादी स्नेहल अशोक झरेकर रा- मगरपट्टा सिटी रोड, हडपसर पुणे सध्या रा बेंगलोर कर्नाटक यांचे वडील अशोक शंकर झरेकर वय ६४ वर्ष यांचे अकाऊंन्ट चा ऑनलाईन अॅक्सेस घेवून वेगवेगळया अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करुन एकुण रक्कम रुपये २४,४८,०००/- रुपयांची फसवणुक केल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १९२९/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३ (५), आयटी ऍक्ट ६६ (ड) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक याचे मार्गदर्शनाखाली निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक, गुन्हे आणि अंमलदार संदीप राठोड, सचिन गोरखे, गायत्री पवार, तेजस पांडे असे करीत असताना, फिर्यादी यांचेकडून माहीती घेतली असता, फिर्यादी यांचे वडिल हे कुटूंबापासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांना दैनंदिन गरजेच्या कामामध्ये ते राहत असलेल्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करणारा हनीफ नावाचा इसम मदत करीत असलेबाबत माहीती प्राप्त झाली. फिर्यादी यांचे वडिलांचे अकाऊंन्टवरून ट्रांजेक्शन झालेले रक्कमे बाबत बँकेकडून माहीती प्राप्त करून त्याची पडताळणी केली असता, ती रक्कम इफ्तीकार खान आणि नूर जहाँ यांचे बैंक अकाऊंन्टवर ट्रांन्सफर झाल्याबाबत दिसून आले. तसेच वॉचमन म्हणून काम पाहणारा इसम हनीफ हा घटनेनंतर काम सोडून फरार झाला होता.

संशयीत इसमांचे मोबाईल नंबर हे बंद झाल्याचे दिसून आले. गुन्ह्याचे केले तांत्रिक तपासामध्ये हनीफ आणि इफ्तीकार खान हे एकमेकांच्या संपर्कात असलेबाबत दिसून आले. संशयीत इसमाबाबत उपयुक्त माहीती गोळा करून पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, गायत्री पवार यांचे पथक गोवंडी, मुंबई येथे जावून त्यांनी केले तपासामध्ये आरोपी इफतीकार रहिमखान पठाण वय ३१ वर्षे, राहणार फ्लॅट नंबर-७०७, ७ वा मजला, रेहान पार्क, गौतम नगर, गोवंडी मुंबई यास ताब्यात घेतले. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याचेकडू हनीफ बाबत माहीती घेतली असता तो सध्या हांडेवाडी पुणे शहरात कोठेतरी राहत असल्याबाबत माहीती प्राप्त झाली त्यावरून पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, कुंडलीक केसकर यांनी आरोपी २) मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर वय ५२ वर्षे, सध्या राहणार म्हसोबा मंदिराचे पाठीमागे, गौरव दुबे यांचेकडे भाड्याने, काळेपडळ, हडपसर पुणे मुळ राहणार पातूर, ता. पातूर जि. अकोला यास ताब्यात घेतले.

आरोपींकडे केले कौशल्यपुर्ण तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सांगीतले की, मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर आणि इफतीकार रहिमखान पठाण हे नात्याने एकमेकांचे मेव्हणे असल्याचे सांगीतले. तसेच मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर हा सिक्युरीटी म्हणून काम करीत असताना, त्यास अशोक झरेकर हे वेगवेगळी कामे सांगत होते त्यामुळे अशोक झरेकर हे एकटे राहत असल्याबाबत इफतीकार पठाण यास हनीफ मार्फत समजले होते. त्यामुळे आरोपी यांनी आपसात संगनमत करून अशोक झरेकर यांचेसोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाचे आहारी नेवून, वेळोवेळी एकत्र बसून, त्यांचे मोबाईलचा व बँकींग अॅक्सेस घेवून, त्यांचे बँक खात्यावरील रक्कम आरोपीनी स्वतःचे व आपले नातेवाईकांचे बँक खात्यांवर परस्पर वळवून, रक्कम रुपये २४,४८,०००/- रुपयांची फसवणुक केल्याचे सांगीतले. आरोपी यांची दिनांक ३१.०३.२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक, गुन्हे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री.डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, अविनाश गोसावी, संदीप राठोड, तेजस पांडे, गायत्री पवार, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!