आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी! चैन स्नॅचिंग करणा-या रेकॉर्डवरील आरोपीस केले जेरबंद
बालाजी शिंदे पुणे प्रतिनिधी
आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०२/०५/२०२५ रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी हे जुना सातारा पुणे रोड वरील गुजखाडी जवळ त्यांची मोपेड गाडी ही रस्ताच्या कडेला पार्क करुन झोपलेले असतांना फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व त्यांची मोपेड गाडी ही चोरटयाने फिर्यादीच्या संमती शिवाय चोरुन नेली होती त्या बाबत आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९१/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील अज्ञात चोरट्याचा इकडील पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे हे शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी आकाश नरहरी शिंदे वय २७ वर्षे रा. जाधवनगर, वडगाव बु पुणे याने केला असल्याची माहिती मिळवून तो दरी पुलाच्या जवळ येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळवल्याने त्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने व पोलीस उप निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापव्व लावून ताब्यात घेतले आहे. त्याने आंबेगाव पो.स्टे गु.र.नं ९१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), सिहगड पोलीस स्टेशन, पुणे शहर तसेच बावधन पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) हददीत चैन स्नॅचींग (जबरी चोरी) केले आहे.
वर नमुद अटक आरोपी याच्याकडून आंबेगाव व सिहगड पोलीस स्टेशन कडील वर नमुद चैन स्नॅचींग गुन्हयातील सोन्याचा मुददेमाल व आरोपी वाने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड गाडी असा ३.९२,०००/- रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्री. मिलींद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभान पुणे शहर श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंगलदार शैलेंद्र साठे, वेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, प्रमोद भोसले, राकेश टेकवडे यांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

