कारागृह व पोलीस विभागातील तीन वरीष्ठ अधिका-यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ पार पडला.


पंकेश जाधव संपादक

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्र शासनाच्या सेवेतुन दिनांक.31.05.2024 रोजी कारागृह व पोलीस विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या तीन वरीष्ठ अधिका-यांचा भव्य सेवापुर्तीचा सत्कार समारंभ आज दिनांक.22.05.2024 रेाजी कै.दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभामध्ये सेवानिवृत्त होणारे कारागृह विभागातील वरीष्ठ दर्जाचे अधिकारी श्री.उमाजी पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, संभाजीनगन व श्री.अंकुश सदाफुले, अधीक्षक, रत्नागिरी विशेष कारागृह तसेच पोलीस विभागाचे श्री.अरुण सावंत, उपअधीक्षक, दक्षता पथक, कारागृह मुख्यालय, पुणे या अधिका-यांचा समावेश होता.

सेवानिवृत्तीच्या समारंभामध्ये मा.श्री.अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते तीनही अधिका-यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे. या प्रसंगी मा.श्री अमिताभ गुप्ता साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त होणा-या या तीन अधिका-यांनी चांगल्या प्रकारे सेवा केली व त्याच बरोबर पोलीस व कारागृह सेवेसारख्या ताणतणावाचे सेवेमध्ये देखील आरोग्य चांगल्या प्रकारे राखुन काम केले याचे कौतुक केले तसेच यापुढे देखील त्यांचे आरोग्य चांगल्या राहो व त्यांचे वैयक्तीक ईच्छा पुर्ण होवो अशा शुभेच्छा दिल्या.

Advertisement

त्याचबरोबर, समारंभास उपस्थित असणारे कारागृह विभागातील वरीष्ठ अधिकारी श्रीमती. स्वाती साठे,कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग पुणे व श्री.योगेश देसाई,उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांनी देखील श्री.पवार साहेब,श्री.सदाफुले साहेब व श्री सांवत साहेब यांचे बरोबर एकत्रित केलेल्या कर्तव्याच्या गतकाळातील चांगल्या प्रंसगाच्या आठवणी सांगुन उपस्थितांना भाऊक केले व इतरांनी देखील त्यांचे सेवेतुन प्रेरणा घ्यावी असे उपस्थितांना आवाहन केले. या समारंभास प्राचार्य श्री.नितीन वायचळ, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे यांचे सह महाराष्ट्र कारागृह विभागातील इतर कारागृह अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमांचे सुत्र संचालन श्री नागेश पाटील,वरीष्ठ तुरुंगाधिकारी यांनी केले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!