ए.टी.एम. सेटंरवर दरोडा टाकण्याचे तयारीत असणारी आंतरराज्यीय टोळी कंटेनर व दरोडयाचे साहित्यास शिरूर परिसरातून केली जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- हरीयाणा व राजस्थान राज्यात ए.टी.एम. सेंटरची चोरी करणारी टोळी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हयात आलेली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथकास मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय यंत्रणा सतर्क करून हरीयाणा व राजस्थान राज्यातून आलेल्या टोळीची माहिती घेण्यास सुरूवात केली असता, सदरची टोळी ही RJ-52-GA-7916 या नंबरचा टाटा कंपनीचा कंटेनर घेवून आलेले असून सदरची टोळी या मालवाहतूक कंटेनर मधून येतात व ए.टी.एम. सेंटर चोरी करतात आणि सदरची टोळी ही पुणे-नगर हायवेवरील सरदवाडी गावचे हद्दीतील हरीयाणा मेवाती ढाबा या ठिकाणी कंटेनर उभा करून थांबलेली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर यांना मिळाली. बातमीचे आधारे स्था.गु.शा. चे पथकाने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे व स्टाफ यांचे मदतीने दि. ०४/११/२०२४ रोजी रात्री १०/०० वा सु ा स पोलीस पथकाने अचानक छापा टाकून कारवाई करून कंटेनरसह तीन इसमांना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेवून त्यांचे इतर दोन साथीदार पळून गेले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपीची नावे १) कुतुबुद्दीन अख्तर हुसेन वय ३१ रा सोमका ता पहरी जि भारतपूर, राजस्थान २) यसीन हारून खान वय ३२ रा गुंडेता ता पुन्हान जि नुह, हरियाणा ३) राहुल रशीद खान वय ३२ रा फलेंडी ता पुन्हान जि नुह, हरियाणा अशी असून इतर आरोपी नामे ४) नौशाद उर्फ नेपाळी पूर्ण नाव माहित नाही ५) लेहकी पूर्ण नाव माहित नाही दोघे राहणार घासैडा गांधीग्राम जि नुह हरियाणा हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
नमुद आरोपींचे ताब्यातून RJ-52-GA-7916 या नंबरचा टाटा कंपनीचा कंटेनर, एटीएम मशीन कटिंग
करण्यासाठी लागणारे गॅस कटर, गॅस टाकी, कटावणी, पहार, स्प्रे बॉटल, रस्सी इत्यादी साहित्य किं. रू. १५,१७,४००/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९२४/२०२४ भा.न्या.सं. ३१०(४) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. नमुद आरोपी यांनी महाराष्ट्रात प्रवेश केल्यापासून कोठे कोठे गुन्हा केला आहे, त्यांचेकडे मिळून आलेल्या
दरोडयाचे साहित्याचा वापर करून सदरची टोळी कोठे गुन्हा करणार होती, अशा विविध मुद्दयांवर स्था.गु.शा.चे पथक व शिरूर पोलीस स्टेशनचे तपास पथक आरोपींकडे तपास करत आहेत.
सदर आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची दि. ०७/११/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले, शिरूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो नि शिरूर संदेश केंजळे, स पो नि हनुमंत गिरी, स्था.गु.शा.चे पो हवा. तुषार पंदारे, पो हवा जनार्धन शेळके, पो हवा राजू मोमीन, पो हवा संजू जाधव, शिरूर पो स्टे चे पो हवा प्रफुल्ल भगत, पो अं विजय शिंदे, नीरज पिसाळ नितेश थोरात, निखिल रावडे यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.
Cheif Editor : Pankesh jadhav