देशी हातबनावटीचे पिस्टल बाळगणा-या सराईतास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस उप आयुक्त साो, गुन्हे, पुणे शहर यांचे आदेशाने परिमंडळ १,२ व ३ पोलीस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस अंमलदार ८३८३ श्रीकांत दगडे व पोलीस हवालदार ५७४ दत्तात्रय पवार यांना भुमकर चौकाकडुन स्वामीनारायण मंदीराकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडलगत साई पॅलेस लॉजच्या पुढे काही अंतरावर एक इसम उभा असुन त्याचेजवळ एक पिस्टल आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

सदर बातमीप्रमाणे खात्री झाल्याने स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करुन सदर इसमास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने आपले नाव व पत्ता केशव अशोक राठोड, वय २५ वर्षे, धंदा- ग्राफिक डिझायनर, रा. घर नं २२३, चरवड वस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे असे सांगितले. त्याची अंगझडती घेता त्याचेजवळ एक देशी हातबनावटीचे पिस्टल व १ जिवंत राऊंड असा एकुण किं रु ४०,२००/- चा अग्निशस्त्र असलेला माल विना लायसन्स व बेकायदेशीररित्या जवळ बाळगताना मिळुन आला. म्हणुन त्याचेविरुध्द आंबेगाव पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट कलम ३ सह २५ व महा पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) सिंहगड रोड पो.स्टे. आर्म अॅक्ट कलम ३ सह २५ व महा पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५
२) सिंहगड रोड पो.स्टे. भादंवि कलम ३२३,३२४,५०४,३४ व आर्म अॅक्ट कलम ४ (२५) व महा पोलीस
अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ सदर आरोपीचा गुन्हे अभिलेख पाहता त्याचेवर गुन्हे दाखल आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुन्हेगारास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केले जेरबंद दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील अंमलदार हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील व मा. पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ३ यांनी तडीपार केलेला आरोपी नामे पियुष ऊर्फ कान्हा सतिश जाधव, रा. कांबळे चाळ, आंबेडकर चौक, वारजे जकात नाका, पुणे हा त्याचे रहाते घराजवळ येणार असलेबाबतची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदरची बातमी मा. वपोनि, नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी स्टाफला रवाना करुन तडीपार इसम मिळुन येतो अगर कसे? मिळुन येताच त्यास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे मौखीक आदेश दिले.

सदर बातमीची स्टाफची खातरजमा झाल्याने स्टाफने वरील ठिकाणी जावुन खात्री केली असता वरील नमुद वर्णनाचा इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता पियुष ऊर्फ कान्हा सतिश जाधव, वय २० वर्षे, रा. कांबळे चाळ, आंबेडकर चौक, वारजे जकात नाका, पुणे असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या तडीपार इसमास पुणे शहरामध्ये येण्यासाठी कोणत्या मा. पोलीस अधिकारी किंवा मा. न्यायालयाची पुर्व परवानगी घेतली आहे का? याबाबत विचारणा केली असता त्याने मी कोणत्याही पोलीस अधिकारी व संबधित न्यायालयाची पुर्व परवानगी घेतली नसल्याचे सांगुन, तसेच त्यास पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात येण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने त्याबाबत स्टाफने वारजे पोलीस स्टेशनकडील सदर इसमाचा तडीपार केलेला आदेश प्राप्त करून घेवुन तशी स्टाफची खात्री झाल्याने सदर तडीपार इसमाविरुध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं ४५२/२०२४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीवर उत्तमनगर, वारजे व हिंजवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. खंडणी व सावकारीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केले जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील अंमलदार हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करीत असताना गस्ती दरम्यान पोलीस नाईक ७५५९ रविंद्र लोखंडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खडक पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं २४०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३) (४) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९,४५ मधील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे नविद मुक्तार शेख, रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे हा त्याचे रहाते घराजवळ असलेले आयशा जनरल स्टोअर्स, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे येणार असलेबाबतची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदरची बातमी मा. वपोनि, नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी स्टाफला रवाना करुन नमुद पाहिजे आरोपी मिळुन येताच त्यास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे मौखीक आदेश दिले.

प्राप्त बातमीचे अनुषंगाने स्टाफने आयशा जनरल स्टोअर्स, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे जावुन पाहिजे आरोपी याचा शोध घेतला असता तो सदर ठिकाणी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव नविद मुक्तार शेख, वय ३३ वर्षे, रा. ७८/वी, कासेवाडी, १० नं कॉलनी, भवानी पेठ, पुणे असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे वरील दाखल गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करता तो दाखल गुन्ह्यामध्ये निष्पन्न असल्याचे कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईकरीता खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे सदरची कारवाई पुणे शहरचे मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. श्री निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) व श्री. नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक, शाहीद शेख, पोलीस हवालदार दत्तात्रय पवार, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, महेश पाटील, साईकुमार कारके, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!