येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास येरवडा तपास पथक कडून बेडया


पत्रकार इमरान शेख पुणे शहर 

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :– लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी पुणे शहरातील बड्या गुन्हेगारांची परेड घेऊन यापूर्वी अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांची देखील हजेरी पोलीस आयुक्त कार्यालयात लावली होती. अशातच येरवडा पोलीसांनी एका सराईताकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार राउंड हस्तगत केले. अभिषेक नारायण खोंड, वय २३ वर्षे, रा लोहगाव रोड, वाघोली पुणे असे सराईताचे नाव आहे. त्याचेवर यापूर्वी येरवडा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल असून मोक्याच्या गुन्हयात येरवडा कारागृहात होता. सहा महिन्यापूर्वी येरवडा कारागृहातून बाहेर आला होता.

Advertisement

सदर बाबत येरवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाचे पोलीस हवालदार कैलास डुकरे व पोलीस अंमलदार सुशांत भोसले हे दि.१७/०४/२०२४ रोजी गुन्हेगार चेक करीत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुंड अभिषेक खाँड याच्याकडे पिस्टल असून तो वडगावशेरी भागातील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत कोणाचीतरी वाट बघत थांबलेला आहे. अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी तपास पथकाचे स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्टल व २ राऊंड मिळून आले. सदरबाबत दि. १८/०४/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुर नं २२०/२०२४ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस कस्टडीमध्ये तपासादरम्यान त्याचेकडून आणखी एक पिस्टल व २ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे असे आरोपीकडून एकूण ६५.५००/- रु किंमतीचे एकूण २ पिस्टल व ४ राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्रीमती आरती बनसोडे, सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, अतिरिक्त कार्यभार येरवडा विभाग, श्री. संतोष पाटील, वपोनि येरवडा, राहुल जगदाळे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!