अवैधरित्या दारु विक्री करणारे ढाबे व वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग अहिल्यानगर यांची धडक कारवाई
पंकेश जाधव संपादक 7020794626
राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन अहिल्यानगर :- विधानसभा निवडणुक आदर्श आचारसंहीता २०२४ च्या अनुषंगाने दि. १५/१०/२०२४ ते आज अखेर विशेष मोहिम राबवुन अवैध हातभट्टी निर्मिती, तसेच अवैधरित्या दारु विक्री करणारे ढाबे व वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग अहिल्यानगर यांची धडक कारवाई
मा.श्री. प्रमोद सोनोने साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर व मा. श्री. प्रविण कुमार तेली, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग अहिल्यानगर जि. अहिल्यानगर यांनी दि. १५/१०/२०२४ ते आज अखेर रोजी एकुण २७ गुन्हे नोंदविले असुल त्यामध्ये २६ आरोपी अटक करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात रु.३,७८, १५०/- किमंतीचा मुद्देमाल कारवाई वेळी जप्त करण्यात आला. तसेच नियम व अटींचे वेळे संदर्भात पालन न करणा-या अनुज्ञप्तीवर विभागीय विसंगती गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
कारवाई मध्ये श्री. बी. एस. घुगे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग अहिल्यानगर, श्री आर. व्हि. झोळ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब १ अहिल्यानगर, श्री. ए. सी. खाडे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब२ अहिल्यानगर व श्री. व्हि. एस. वरठा दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब -३ अहिल्यानगर श्री. आर.एम. पारधे, सहा. दु. नि जवान सर्वश्री योगेश मडके, श्री. अविनाश कांबळे, श्री. एन. डि. बहुरे, सौ. पुनम एन. आर जवान नि वाहनचालक पांडुरंग देवदास गदादे हे सहभागी झाले होते.
तरी जनतेस आव्हान करण्यात येते की, अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री संदर्भात कोणतेही माहिती अथवा तक्रार असल्यास १८०० २३३९ ९९९ व व्हाटस अॅप क्र. ८४२२००११३३ या क्रमांकावर संपर्क साधवा.
Cheif Editor : Pankesh jadhav