स्वारगेट पोलीसांची दमदार कामगिरी ! प्रवाशांचे मोबाईल फोन चोरी करणाऱ्या चोरटयास केले जेरबंद.
पंकेश जाधव संपादक 7020794626
स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. २६/२०२४ भा.द.वि. कलम.३७९ मधील फिर्यादी नामे मयुर अनिल चक्रनारायण वय ३३ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. समृद्धी एंन्टरप्रायझेस, पर्वती पायथ लक्ष्मीनगर, राज मित्र मंडळाजवळ पुणे हे दि.२०/०१/२०२४ रोजी सायंकाळी ०६/२५ वा. सुमारास फिर्यादी हे स्वारगेट पीएमपीएल बस स्टॅन्ड येथे स्वारगेट हडपसर या पीएमपीएल बसमध्ये कॅम्प पुणे येथे जाण्यासाठी चढत असताना त्याचे पॅन्टचे उजव्या बाजुकडील खिशात ठेवलेला त्याचा अॅपल कंपनीचा आयफोन १३ हा मोबाईल गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे संमतीविना लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला म्हणुन अज्ञात चोरटयाविरुद्ध फिर्यादी यांनी कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयातील मोबाईल फोनचा व आरोपीचा शोध घेणेबाबत आम्ही स्वतः आदेशीत केले होते.
त्यावरुन सपोनि संदे, पोशि १०१४७ घुले, १००१६ गायकवाड व पोशि १००५७ पवार यांनी दाखल गुन्हयातील चोरटयाचा व गेले मालाचा खास बातमीदारामार्फत तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता संशयीत चोरट्याबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या आधाराने स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे वर नमुद अधिकारी व स्टाफ असे सापळा लावुन थांबले असताना मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन संशयीत इसम दिसुन आल्याने त्यांचे दिशेने जाताच ते पळुन जावु लागल्याने वरील स्टाफच्या मदतीने त्यांचा शिताफीने पाठलाग करुन त्यांना पकडले असता त्यांनी त्यांचे नावे १) दत्तात्रय रामदास गाडे वय ३४ वर्षे रा. गुनाट ता.शिरुर जि पुणे २) किरण शेवाराम चव्हाण वय ३४ वर्षे रा स्वारगेट कॅनॉलजवळ स्वारगेट पुणे असे असल्याचे सांगितले दााखल गुन्हयाच्या तपासादरम्यान सदर आरोपीकडुन दाखल गुन्हयातील अॅपल कंपनीचा मोबाईल फोन व त्यांनी स्वारगेट एस टी स्टॅन्ड परिसरातुन वेळोवेळी चोरी केलेले २,०५,०००/- रुपये किंमतीचे एकुण १६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा.श्री. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर. मा. श्रीमती नंदिनी वग्यानी साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेशसिंग गौड, संगीता पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पो.हवा. विजय कुंभार, पो. हवा. संदिप मुंढे, पो.ना. तात्या देवकाते, सोमनाथ कांबळे, सुजय पवार, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, प्रविण गोडसे, दिपक खेंदाड, संजय मस्के, यांनी एकत्र मिळून केली आहे…

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

