64 वा महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे ध्वजास मानवंदना देण्यात आली..
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 1 मे 2024 रोजी 64 वा महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे मा. डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय), कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे हस्ते सकाळी 7.20 वा. ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली, त्यानंतर मा. डॉ. जालिंदर सुपेकर साो यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यावेळी श्री. नितीन भा. वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे, व 14 अधिकारी, 75 कर्मचारी
तसेच मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मा. डॉ. जालिंदर सुपेकर साो यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना हस्तांदोलन करुन महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Cheif Editor : Pankesh jadhav