दारू पिण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या चोरास मुद्देमालासह के.के. घुले चौक, मांजरी, येथून घेतले ताब्यात,युनिट-५, गुन्हे शाखेची कामगिरी.
आकाश पांचाळ सह-संपादक
गुन्हे शाखा, युनिट -५, पुणे शहर.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- हडपसर पोलीस स्टेशन येथील, घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ५ यांनी अटक केली आहे, आरोपी हा दारू पिण्यासाठी घरफोड्या करायचा यासंदर्भात पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे त्यांच्या पथकाने आरोपीला चोरीच्या मुद्द्यामाला सहित अटक केली आहे, आरोपी हा चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी आला असता मुद्देमाला सहित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील घावटे व्हिजन बिल्डींग घावटे वस्ती मांजरी ब्रु. पुणे येथे दि. १८/०२/२०२४ रोजी दिवसा फिर्यादीच्या घरातील लॅपटॉप व मोबाईल कोणतरी अज्ञात चोरटयाने लबाडीचे इराद्याने चोरी केली म्हणुन हडपसर पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल नोंद झाला.
दाखल गुन्हयाचे घटनास्थळी गुन्हे शाखा, युनिट-५ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे व स्टाफ यांनी भेट देऊन तपास चालु केला. तपासादरम्यान युनिट-५कडील पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना त्यांचे बातमीदारांमार्फतीने बातमी मिळाली की, एक संशईत इसम याचेकडे चोरीचा लॅपटॉप व मोबाईल असुन तो विक्री करणेकामी के.के. घुले चौक, मांजरी, पुणे येथे संशयितरित्या वावरत आहे बातमी मिळाली. नमुद बातमीच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे मांजरी येथुन एक संशयित इसम नामे दिलीप कृष्णराव नाईक, वय- ४७ वर्षे, रा. किशोर कदम यांचेकडे भाड्याने फ्लॅट नं २०३, विहार कॉम्प्लेक्स, म्हसोबा वस्ती, झेड कॉर्नर, मांजरी, पुणे यास त्याचेकडील ३०,५००/-रु.कि.चा लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, लॅपटॉपबॅग व रेडमी कंपनीचा मोबाईल सह ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने दारु पिण्याकरीता पैसे पाहिजे म्हणुन लॅपटॉप व मोबाईल फोन चोरी करुन ते विक्री करीता आलो असल्याचे सांगितले. यावरुन हडपसर पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि. नं. ३१३/२०२४, भा.दं.वि. कलम ४५४, ३८० हा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील ३०,५००/-रु.कि.चा सर्व मुद्देमाल जप्ता करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस अंमलदार अमित कांबळे, दया शेगर, पल्लवी मोरे, स्वाती गावडे, पांडुरंग कांबळे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

