बंडगार्डन पोलिसांची दमदार कामगिरी ! भिवंडी शहर पो स्टे खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
बंडगार्डन पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्युज ! ऑनलाईन पुणे :- बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी/ अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व पो शि ज्ञाना बडे ,मनोज भोकरे यांना cctv फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या बातमीवरून माहिती मिळाली भिवंडी ज़िल्हा ठाणे येथे एका इसमास गंभीर जखमी करून इसम नामे रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनवणे वय 22 वर्षे राह. नदी किनारी, 13 ताडीवाला रोड, पुणे येथे आला असून सदर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. सदर आरोपीस भिवंडी शहर पो स्टे पोलीस पथक यांचे ताब्यात दिले.
सदर आरोपी खालील गुन्ह्यामध्ये पाहिजे होता भिवंडी शहर गुन्हा नोंद क्रमांक. 302/2024भा.द.वि302,307,363,143,144,147,367,364,34 पुढील तपास (भिवंडी शहर पोस्टे करीत आहेत.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, पो.शि ज्ञाना बडे,शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

