हॉटेलमध्ये वेटरचे कामे करत, ०७ मोटारसायकली चोरी करणाया सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया


पंकेश जाधव संपादक 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :-तक्रारदार नामे बळीराम संजय बेळगे, वय-२७ वर्षे, धंदा-सेक्युरीटी, सद्या रा- आपले घर लेन नं.०५, आदित्य निवास, दिपक देशमुख यांचेकडे भाडयाने, खराडी पुणे यांनी दिनांक २३/०१/२०२४ रोजी रात्रौ २२/०० ते दिनांक २४/०१/२४ रोजी सकाळी ०६/०० वाजे दरम्यान, त्यांचे मालकीची हिरो कंपनीची काळ्या च राखाडी रंगाची, स्लेंडर प्लस गाडी तीचा आरटीओ नंबर एमएच-२६/ओझेड-०१५२ ही गाडी त्यांचे राहते चिल्डींगचे खाली गेट समोर रोडलगत लॉक लावून पार्क केली असताना, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले बाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.४९/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयातील चोरीस गेले मालाचा व अज्ञात चोरटयाचा चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे मा. मनिषा पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक साो चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना, पोलीस अंमलदार ४३५२ कोद्रे, पोलीस अंमलदार ३९३३ जाधव यांना, यर नमुद गुन्हयातील मोटार सायकल चोरी करणारा चोरटा इसम हा चोरीची मोटार सायकल घेवुन शेल पेट्रोलपंप येथे थांबला असल्याचे माहिती मिळाल्या वरून, तपास पथकाचे पोलीस स्टाफने सदर मोटार सायकल चोर नामे तुकाराम ईश्वर आव्हाड़े वय २२ वर्षे धंदा मजुरी रा. जोगेश्वरी हॉटेल, जकात नाका, पुणे नगर रोड, खराडी, पुण मुळ पत्ता मु.पो. राचन्नावाडी ता. चाकुर जि. लातुर याला ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने वर नमूद गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला अटक करून, त्याचे ताब्यात मिळुन आलेली दाखल गुन्हयतील १ स्प्लेंडर प्लस नंबर एमएच-२६/ओड्रोड-०१५२ ही जप्त करणेत आली. अटक मुदतीत त्याला विश्वसात घेवून, अधिक सरखोल तपास केला असता, त्याने गेल्या ३-४ महिन्यांपासून विश्रांतवाडी, चंदननगर व हडपसर परीसरातून मोटार सायकली चोरी केल्या असल्याचे सांगितले व त्याने सांगितले प्रमाणे त्याने चोरी केलेल्या गाडया ज्या टिकाणी लपयुन ठेवल्या होत्या त्या ठिकाणी एकुण ०६ मोटार सायकली जप्त करणेत आलेल्या आहेत, असे एकुण २,३५,०००/- रूपये किंमतीच्या एकुण ०७ मोटार सायकली आरोपीत याचे कडून जप्त करणेत आलेल्या आहेत. सदरचे जप्त मोटार सायकलींचा तपास करता खालील प्रमाणे गुन्हे ऊघडकीस आलेले आहेत.

Advertisement

1) विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि.नं.३००/२०२३ भादवि कलम ३७९

२) चंदननगर पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजि. नं. ४७१/२०२३ भादवि कलम ३७९

३) चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजि. नं.५३/२०२४ भादवि कलम ३७९

असे वरील प्रमाणे गुन्हे ऊघडकीस आलेले आहेत तर इतर ३ चोरीच्या परंतु अभिलेखावर नसलेल्या (बिनधनी) गाडयांचे अनुषंगाने अधिक तपास, तपासी अधिकारी पोउपनिरी गोरक्ष घोडके करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर- श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर- श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. संजय पाटील साहे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. मनीषा पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, पो.उप. निरीक्षक गोरक्ष घोडके, तपास पथक प्रभारी अधिकारी सहा.पो.निरीक्षक प्रशांत माने, पो.उप. निरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, शिवाजी धांडे, संतोष लवटे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, नितीन कांबळे, गजानन पवार यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!